मूर्तिजापूर विधानसभेच यावेळेसच चित्र फार वेगळ आहे. आता सर्वच उमेदवार धावपट्टीच्या सुरुवातीच्या पॉंईंटवर उभे असून उद्यापासून शर्यतीला सुरुवात होणार आहे. यामध्ये कोण मागे कोण पुढे याच विवरण दररोज आपल्याला मिळणार आहे. त्यापूर्वी आज १६ लोकांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता उरले १५ उमेदवार, यातील फक्त चार उमेदवारच या शर्यतीत टिकू शकतात तर आता पर्यंत जो सर्वात पुढे मानला जात होता तो आता मागे गेल्याने आता या विधानसभेचं चित्रच बदलले आहे. राजकारणात कधी काय बदल होतील हे सांगता येत नाही .
अगोदर येथे जातीपातीचे राजकारण सुरू होतं. त्यामुळे या मतदारसंघात फक्त अनुसूचित जातीच्या एकाच उमेदवाराला संधी देत होते. तर आता लोकांनी विकास जो करेल त्याच्याच पाठीशी येथील जनता असणार असल्याचे मतदार सांगतात. विकास करणारा कोणताही उमेदवार असू शकतो?. याचा अंदाजही जनतेला घेतला असून जो सर्वच समाजाच्या कामाचा असेल त्यांच्यासाठी येथील जनता मतदान करणार. मतदारसंघात फक्त वंचित आणि भाजप यांचेच मतदार फिक्स असल्यामुळे इतर पक्षाच्या मताबद्दल काही आकडा सांगता येणार नाही.
मूर्तिजापूर विधानसभेमध्ये प्रत्येक पक्षात बंडखोरी दिसून आल्याने आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती तर आज 31 पैकी 16 लोकांनी अर्ज मागे घेतले आहे यामध्ये प्रामुख्याने राजेश तुळशीराम खळे, रवींद्र नामदेव पंडित, भावराव सुखदेव तायडे, संतोष देविदास इंगळे, अरुण सखाराम गवळी, दयाराम बुद्रुक घोडे, सिद्धार्थ ब्रह्मदेव डोंगरे, गोपाळराव हरिभाऊ कटाळे, गजानन शिवराम वजीरे, पंकज ओंकार सावळे, महेश पांडुरंग घनगाव, राजकुमार नारायण नाचणे, विनोद बाबुला सदाफळे, सुनील वानखडे, पुष्पाताई माधराव इंगळे, महादेव बापूराव गवळे, या 16 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे पत्रक मूर्तिजापूर निवडणूक अधिकाऱ्याकडून प्राप्त झाले.