तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील माडगी शिवारातील दूग्ध कंपनीचा प्रताप.
नागरीकासह पाळिव जनावर ,वन्यप्राण्यांना दुषित पाणी ठरते ‘विष’
भंडारा – सुरेश शेंडे
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील माडगी शिवारातील दुग्ध संकलन केंद्रातील रसायनयुक्त दुषीत पाण्याची विल्हेवाट चक्क येथिल दुग्ध कंपनी चालक तुमसर-तुडका शिवारात असलेल्या बावनथडीच्या कालव्यात सदर दुषीत पाण्याची विल्हेवाट लावत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.परीणामी येथिल दुषीत रसायनयुक्त पाणी नागरीकासह पाळीव जनावर व वन्य प्राण्यांना धोकादायक ठरत आहे.
तालुक्यातील माडगी शिवारात दोन दुध संकलन केंद्र आहेत.येथिल एका दुध कंपनी कडुन कंपनीतील दुषित व रसायनयुक्त पाणी तुकडा -तुमसर शिवारातील बावनथडी कालव्यात टॅकर व्दारे सोडत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
सदर प्रकाराचा विडोओ देखिल समाजा माध्यमावर नागरीका़नी घातला आहे. सदर दुषित पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. कालव्यातील दुषीत पाण्याने मासोळ्या व अनेक जिवज़ंतु मृत्यूमुखी पडले आहेत.
कदाचित येथील कालव्यातील जनावरांनी नकळत पाणी पिल्यास वन्यजीव अथवा पाळीव जनावरे दगावण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.व सदर पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
व येथिल नागरीकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. तरी संबधित बावनथडी विभाग व प्रदुषण नियंत्रण विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून संबधित दुध कंपनी चालकांवर कारवाई करण्याची मागणी येथिल नागरिकांनी केली आहे.
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील माडगी शिवारातील अग्रवाल दुध कंपनीचे रसायनयुक्त दुषित पाणी तुमसर -तुडका शिवारातील बावनथडी कालव्यात टॅकर व्दारे सोडत आहेत.परिणामी दुर्गंधीने येथिल नागरीका़चे आरोग्य धोक्यात आले आहे. पाळीव जनावरे व , वन्यप्राणी मृत्यूमुखी पडण्याची शक्यता आहे.
तरी प्रदूषण नियंत्रण विभाग व बावनथडी विभागाने संबधित दुध कंपनी चालकांवर कारवाई करावी.अन्यथा कंपनी विरोधात आंदोलन करण्यात येईल श्याम नागपुरे. उपसरपंच स्टेशन टोली.