ईपीएस निवृत कर्मचाऱ्याचे पंतप्रधान यानां पत्र…
रामटेक – राजु कापसे
रामटेक ईपीएस निवृत कर्मचारी (१९९५) राष्ट्रीय समन्वय समिती, शाखा रामटेक तर्फे उपविभागीय अधिकारी व जिल्हाअधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवन्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरिशचंद्र नंदनवार, उपाध्यक्ष दयाराम चंदनबटवे, सचिव लक्ष्मण रामटेके, कोष्याधक्ष पुंडलिक फुलझेले, नवीचंद ठक्कर सहित आदि उपस्तित होते. नीवेदन मधे भगतसिंग कोशीयारी समितीचा अहवाल लागू करण्यात यावा. पेंशन धारकाना 9 हजार प्रति महीना पेंशन व त्यावर महमाई भत्त्ता देण्यात यावे.
ते म्हणाले की पंधरा वर्षा पासुन सतत संघर्ष करत आहोत. परंतु सरकारने यांची दखल घेतली नाही. आता तातडीने दखल घ्यावी. नंदनवार म्हणाले की नीवृत्य कर्मचारि यानां 1500 ते 4000 रुपये पेंशन मिळत असल्याने देसभर एकदम हलाखीचे जीवन जगत आहे.
त्यातच रोगराई, परिवाराचे पालन कसे करावे. भारत देशाला उनत्तिवर नेनाऱ्या नीवृत्य कर्मचारी यांचे देशभर आतोनात हाल होत आहेत. केंद्र सरकारने तातडीने लक्ष्य द्यावे. कर्मचारी यांच्या अंत पाहु नये.