Thursday, October 24, 2024
Homeराजकीयअकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात आता काँग्रेस कडून मराठा उमेदवार देणार?

अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात आता काँग्रेस कडून मराठा उमेदवार देणार?

राज्यात विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून मात्र महाविकास आघाडी कडून अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. अशातच अकोला पश्चिम मतदार संघात आता काँग्रेस मराठा उमेदवार देणार असल्याचे समजते याबाबत चर्चाही जनसामान्यात होत आहे. तर अन्नपूर्णेश पाटील यांचं नाव सध्या आघाडीवर असून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच मतदार संघात भाजपने सुढा उमेदवारी निश्चित केली नसून अगोदर काँग्रेस कोणता उमेदवार देईल यावर भाजपचा उमेदवारी निश्चित होणार असल्यास मानले जात आहे. मात्र यावेळी इलेक्टिव मेरिट असलेला मराठी भाषिक असलेल्याला उमेदवारास उमेदवारी दिल्यास अकोला पच्छिम मधे निवडून येईल असे सध्या परिस्थिती सध्या दिसून येत आहे. तर मतदारसंघातही असंच वातावरण आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारांची चुरस सुरू झाली असून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी जोराने कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या जागा उद्या जाहीर होणार असल्याचे समजते. काल महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव गटाकडूनअकोला पूर्वसाठी गोपाल दातकर यांची निवड करण्यात आली. तर ही आता जागा काँग्रेसला सुटणार असल्याचे निश्चित झाले असून या ठिकाणी काँग्रेसचा तगडा उमेदवार दिला जाईल असल्याचा समजते. तर याच मतदारसंघात आतापर्यंत कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नसून उद्यापर्यंत सर्व स्थिती या मतदारसंघाची स्पष्ट होईल. या मतदारसंघात महायुतीच्या वतीने सर्वात जास्त उमेदवारांनी आपले दंड थोपटले असून आपणालाच तिकीट मिळाली पाहिजे यासाठी मुंबई शड्डू ठोकून आहे.

अकोला पश्चिम मध्ये गेल्या ३० वर्षात एकही मराठी उमेदवार पक्षाने दिला नाही वस्तूस्थिती अशी आहे या भागात ६० टक्के लोक मराठी भाषिक आहेत आणि ३० टक्के लोक हिंदी आणि उर्दू हा विचार करता मराठी माणूस चा नवीन चेहरा असेल तो या भागात कायम मतदारांच्या लक्षात राहील अशा आवेशाने जर कुठल्याही पक्षाने एक उमेदवार जे मराठी भाषिक असेल आणि तो पश्चिम मतदार संघातील असेल तर त्याला अधिक मदत मतदार देण्याचा निर्धार केला आहे. आता इतर पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी मराठी उमेदवार देते का याकडे सर्वांचे लक्ष लागले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: