अकोला पश्चिम मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही मध्ये उमेदवारांच्या नावांच्या घोषणेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहेय…दोन्ही बाजूने उमेदवारांची संख्या मोठी आहेय.. अकोला पश्चिम हा भाजपचा गेल्या तीन दशकांपासून गड राहिला आहेय..भाजपने या ठिकाणी अद्यापही उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही मात्र आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा भाजपाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश महासचिव तथा भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी केला आहेय…
2019 च्या निवडणुकीत सुद्धा ओळंबे यांना डावळल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज भरला होता मात्र भाजपाने त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता…मात्र यंदाही भाजपने आपला टिकीट कापल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्यावर अशोक ओळंबे ठाम असल्याची भूमिका घेतलीय…अशोक ओळंबेच्या या भूमिकेमुळे भाजपची अकोला पश्चिम मध्ये डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहेय..विशेष म्हणजे अशोक ओळंबे यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात ‘ आपला माणूस ‘ म्हणून प्रचाराला देखील निवडणूक आधीच सुरुवात केली आहे हे विशेष..