Wednesday, October 23, 2024
HomeBreaking Newsशिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर...बडनेरा मधून सुनील खराटे...जाणून घ्या...

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर…बडनेरा मधून सुनील खराटे…जाणून घ्या यादी..

महायुतीच्या तीनही घटकपक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर आताच महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ६५ उमेदवारांचा समावेश आहे. तर अकोल्यातून बाळापूर विधानसभा मतदार संघात नितीन देशमुख व अकोला पूर्व मधून गोपाळ दातकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्रातील जनतेच्या नाहीत तर देशभरातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत. अश्या अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आले आहे तर याच मतदारसंघात रवी राणा हे युवा स्वाभिमानी पक्षाचे तगडे उमेदवार असल्याने त्यांच्या विरोधात सुनील खराटे यांना उमेदवारी दिल्याने आता याच मतदारसंघातील रंगत वाढली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: