महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत. महाराष्ट्रात महायुती युती एकत्र निवडणूक लढवत असून त्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित गट) यांचा समावेश आहे. जागावाटपाबाबत नुकत्याच झालेल्या दीर्घ बैठकीनंतर भाजपने आज पहिली यादी जाहीर केली.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदरासंघातून तिकीट जाहीर झालं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अकोला पूर्व मतदार संघातून रणधीर सावरकर यांचं नावं जाहीर झालाय, रणधीर सावरकर यांनी दोन वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे… नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. धुळ शहरमधून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिंदखेडामधून जयकुमार रावल यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.
शिरपूरमधून काशीराम पावरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अमोल जावळे यांना रावेर, संजय सावकारे यांना भुसावळ, सुरशे भोळे यांना जळगाव, मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा चाळीसगावातून, गिरीश महाजन यांना जामनेर, आकाश फुंडकर यांना खामगाव, संजय कुटे यांना जळगाव (जामोद), रणधीर सावरकर यांना अकोला पूर्व, प्रताप अडसद यांना धामगाव रेल्वे, प्रवीण तायडे यांना अचलपूर, राजेश बकाणे यांना देवळी, समीर कुणावर यांना हिंगणाघाट, तर डोंबिवलीमधून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.
BJP releases first list of 99 candidates for Maharashtra assembly polls, fields Deputy Chief Minister Devendra Fadnavis from Nagpur South West. (n/1)#MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/PrMMrw5ir7
— Press Trust of India (@PTI_News) October 20, 2024