Saturday, December 21, 2024
Homeराज्यआमदार रवि राणा यांना धक्का...

आमदार रवि राणा यांना धक्का…

अमरावती – प्रणव हाडे

अमरावती येथील युवा स्वाभीमान पार्टीच्या स्थापनेच्या पूर्वी पासुन आ.रवि राणा यांचे कट्टर समर्थक म्हणून समजल्या जाणारे युवा स्वाभीमान पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ता जितु दुधाने यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रवि राणा साठी हा धक्का मानल्या जात आहे.

युवा स्वाभीमान पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी जितु दुधाणे यांची प्रचंड मेहनत आहे. गावा- गावात शाखा स्थापन करुन पक्ष बांधणीच्या कार्यासोबतच २००९,२०१४,२०१९ या तिनही विधानसभा निवडणूकीत व २०१४, २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत ही निष्ठेने व प्रामाणीकपणे काम केले.

मात्र पक्षात आता घुसमट होत असुन माझ्या पदाचा राजीनामा स्वीकारुन युवा स्वाभीमान पक्षाच्या जवाबदारीतून मुक्त करावे असे जितु दुधाने यांनी पत्रात नमुद करत मला मनाला अत्यंत वेदना होत असल्याचेही म्हटले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: