Wednesday, October 16, 2024
Homeराज्यसमर्थ प्रा. शाळेत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी...

समर्थ प्रा. शाळेत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी…

रामटेक – राजू कापसे

आज दिनांक 15 ऑक्टोबर ला शहरातील समर्थ प्र‍ाथमिक शाळा येथे भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाइल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती ‘ वाचन प्रेरणा दिन ‘ म्हणून साजरी करण्यात आली.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका साै.कविता जाैजाळ मँडम यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून सांगितले तथा आजपासुन ‘ एक तास वाचनासाठी ‘ या उपक्रमाची सुरवात केली.

त्याकरीता शाळेतील ग्रंथालयातील विविध गोष्टींचा व इतर पुस्तकांचे वाटप आज विद्यार्थांना करण्यात आले. सदरील कार्यक्रमांमध्ये शाळेतिल सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: