Saturday, December 21, 2024
Homeराज्यमातृका फाउंडेशन द्वारे महिला सन्मान करिता कॅन्डल मार्च पथनाट्य...

मातृका फाउंडेशन द्वारे महिला सन्मान करिता कॅन्डल मार्च पथनाट्य…

रामटेक – राजु कापसे

रामटेक मातृका फाउंडेशन रामटेक द्वारे महिला सन्मान करिता नवरात्री उत्सवामध्ये कॅन्डल मार्च पथनाट्चे महिला कलाकारानी शीतला माता मंदिर, सार्वजनिक बाल मित्र नवदुर्गा उत्सव मंडळ पाप धुपेश्वर वार्ड , गायत्री मंदिर, सुदर्शन नगर , शितलवाडी रामटेक, तसेच पारशिवनी स्थित कुवारा भीवसेन इथे सादरिकरन केले. जनतेला महिलाच्या सन्मान करण्याचा संदेश दिला गेला.

पथनाट्मधे महिला कलाकारानी प्रत्येक घरातिल देवीच्या रुपातिल स्त्रीचा सन्मान करा. तिला आनंद द्या, स्वातंत्र्य द्या, तिच्यावर होणारा अत्याचार थांबवा. प्रत्येकाच्या घरात असलेल्या लक्ष्मी , दुर्गा स्वरूपातील आई, बहीण,पत्नी यांची काळजी घ्या. हा उद्देश समोर ठेवून मातृका फाउंडेशन रामटेक, ने कॅन्डल मार्च हे पथनाट्य रामटेकरांसमोर सादर करण्यात आले. माजी आमदार आशिष देशमुख यांच्या द्वारे सत्कार करण्यात आला.

या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन डॉ.अंशूजा किंमतकर यांनी केले. यात लक्ष्मी मातरे, जया राठोड , सरोज करडपाते, मेघा वंजारी. शितल उईके, मनस्वी तीबुढे, राखी संभलवार, नवशिका घाटोडे, विधी खोब्रागडे, गार्गी रहाटे,जीविका वंजारी, व दुर्वा लेंडे यानी सादरीकरण केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: