Wednesday, October 16, 2024
Homeराज्यसोशियल मीडियाचा गैरवापर थांबवा - डॉ. प्रशांत कसारे...

सोशियल मीडियाचा गैरवापर थांबवा – डॉ. प्रशांत कसारे…

शोषणमुक्त समाज घडविणे हा आपला संकल्प – डॉ. नारायण मेहरे

अखिल भारतीय ग्राहक पंचायत झाली ५० वर्षाची…

नागपूर – राजु कापसे

सोशियल मीडियावर येणाऱ्या फेक मेसेज मुळे एखाद्या व्यक्तीचा हृदय दाबाने जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे माणूसकी चे भान ठेवून सोशल मीडियावरील गैरवापर थांबविण्याचे आवाहन यवतमाळ येथील सुप्रसिद्ध आर्थोपेडिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत कसारे यांनी केले आहे.

तर स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांनी १९७४ साला पासून सुरू केलेल्या एका चांगल्या कार्याला पन्नास वर्षे झालीत. सरकार कोणाचेही असू दे आज पर्यंत एमआरपी वर तोडगा काढू शकली नाही.

स्वर्गीय बिंदू माधव जोशी व स्वर्गीय राजाभाऊ पोफळी यांच्या स्वप्नपूर्तीचा शोषणमुक्त समाज घडविणे हा आपला संकल्प असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत चे अध्यक्ष डॉक्टर नारायण मेहरे यांनी व्यक्त केले.

६ सप्टेंबर १९७४ साली अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या एका रोपट्याची लागवड केली होती. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले, अर्थातच आपली अखिल भारतीय ग्राहक पंचायत पन्नास वर्षाची झाली आहे. कायद्याच्या भरवशावर समस्या सोडविणे अवघड आहे, तेच काम संघटनेच्या माध्यमातून समस्या एका झटक्यात सोडविता येतात.

अशी माहिती अ.भा. ग्रामपंचायत विदर्भ प्रांत सचिव नितीन काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून दिली आहे. विदर्भप्रांती संघटन मंत्री डॉक्टर अजय गाडे व अनिल शेंडे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

स्वर्ण जयंती वर्ष समापन कार्यक्रम रविवार दि.१३ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील संस्कृती संवर्धक मंडळ, संघ कार्यालयात आयोजित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ येथील सुप्रसिद्ध आर्थोपेडिक डॉ. प्रशांत कसारे, अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे,

संघटनमंत्री डॉ. अजय गाडे, सचिव नितीन काकडे, डॉ. केशव चेटूले, अनिल शेंडे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून भंडारा, मौदा, अमरावती, वर्धा, यवतमाळ व इतर ठिकाणांहून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. केशव चेटूले यांनी केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: