अमरावती – दुर्वास रोकडे
गेल्या चार महिन्यापूर्वी विद्युत प्रवाहाच्या तारेमुळे गायींचा मृत्यू झाला होता. दरम्यान संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी शासनस्तरावर योग्य पाठपुरावा करत नुकसनाग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली. आज नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसणाची रक्कम जमा झाली.
भातकुली तालुक्यातील हरताळा गावालगत असलेल्या असलेल्या शेतातून जाताना वीज वितरण कंपनीच्या उच्च दाब वाहिनीच्या प्रवाहित तारा पडल्याने तब्बल आठ गायीचा घटनास्थळी मृत्यू झाला होता.
कदम यांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थिति नियंत्रणात आणली होती. हरताळा येथून शेतातून कृषि पंपाच्या पुरवठ्या करिता व विविध शेतीउपयोगी कामाकरिता वीज वितरण कंपनीची उच्च दाब वाहिनी गेली आहे.
या वाहिनीच्या जीवंत विद्युत तारा दीपक सनके,किशोर देशमुख,दिलीप दुर्गे,गजानन राऊत,राजू उघडे,ज्ञानेश्वर चहाकर,जगणराव चुनघोडे यांच्या मालकीच्या तब्बल आठ गाईवर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
त्यांना वीज वितरण कंपनी व शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मांगणी कदम यांनी केली होती. आता शासनाने या नुकसान व घटनेची दखल घेऊन मदत रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या या कौतुकास्पद पाठपुराव्याचे संपूर्ण भातकुली परिसरातून कौतुक होत आहे.
दरम्यान यावेळी दीपक सनके,किशोर देशमुख,दिलीप दुर्गे,गजानन राऊत,राजू उघडे,ज्ञानेश्वर चहाकर,जगणराव चुनघोडे, संकल्प शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय चूनकीकर, प्रफुल महल्ले, मोहन भातकुलकर,रोशन सनके,शिवा देशमुख, प्रदीप ठाकूर, आश्विन दुर्गे, सचिन वानखडे व ईतर गावकरी उपस्थित होते