Thursday, January 2, 2025
HomeMarathi News Todayदर्यापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पार्सल उमेदवाराचा विषय संपला?...भाजप जिल्ह्यातील नवीन उमेदवारलाच देणार...

दर्यापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पार्सल उमेदवाराचा विषय संपला?…भाजप जिल्ह्यातील नवीन उमेदवारलाच देणार संधी?…

योगेश चांदणे, राजकीय ब्यूरो

दर्यापूर विधानसभा मतदारसंघात सध्या पार्सलचा मुद्दा उफाळून बाहेर येत आहे तर जिल्ह्याबाहेरील पार्सल उमेदवार या मतदारसंघात सक्रिय झाल्याने स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. तर गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाकडे ढुंकून न बघणारे चेहरे आता मतदारसंघात दिसू लागल्याने नागरिकांच्या विविध चर्चेला उधाण आले आहे. शहरातील व तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील उमेदवार या मतदार संघात सक्रिय होणे अपेक्षित होते मात्र इतर जिल्ह्यातील पार्सल उमेदवार या मतदारसंघात सक्रिय झाल्याने मतदार संघातील जनता बुचकळ्यात पडली आहे. कालच माजी खासदार नवनीत राणा यांनी दर्यापुरात मतदारसंघात मतदारांच्या भेटीच्या कार्यक्रमादरम्यान पार्सल चा मुद्दा उपस्थित केला होता तर जिल्ह्यातील अनेक चेहरे या मतदारसंघासाठी चांगले असून सुद्धा बाहेरच्या पार्सल उमेदवारांनी येथे धुमाकूळ घातला असल्याचे दिसत आहे. तर कोणी नोकरीच्या संदर्भात कार्यक्रम घेऊन युवकांना भूलथापा देण्याचे काम करीत आहे तर कोणी स्वतःला लॉन्च करण्यासाठी मुंबईतील मोठ्या नेत्याला दर्यापुरात आणून सर्व मतदारांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे दिसत आहे.

मात्र मतदारसंघातील जनता बाहेरच्या पार्सलचा आतापासून विरोध करीत असल्याचे निदर्शनाला आहे तर अनेक ठिकाणी कार्यक्रमानिमित्त पार्सल उमेदवारी लावलेले बॅनर ,पोस्टर काही ठिकाणी जनतेने फाडले असल्याचे समोर आले आहे. तर दर्यापूर मतदारसंघाला पार्सल उमेदवार नको तर स्थानिक एखादा चांगला चेहरा मिळावा यासाठी येथील जनता आग्रही आहे. नवनीत राणा यांनी काल एका सभेदरम्यान अभीजीत अडसूळ यांच्यावर टीका करीत बाहेरचे पार्सल येथे चालणार नसल्याचे बोलले होते तर हा मतदारसंघ महायुतीतील भाजप पक्षालाच मिळून देऊ यासाठी नवनीत राणा प्रयत्न करणार असल्याचे त्या बोलल्या होत्या. त्यामुळे आता भाजप या मतदारसंघातील सक्षम चेहरा देणार असल्याचे दिसत आहे. तर भाजपमधील जुने चेहरे सोडून नवीन चेहऱ्यांना संधी आता या मतदार संघात देणार असल्याचे बोलले जाते.

भाजपकडून नवीन चेहरा या मतदारसंघात देणार असल्याने महायुतीतील घटक पक्षांचा या मतदारसंघात खेळ संपला असल्याचे दिसत आहे. नवनीत राणा ह्या स्वतः या मतदार संघात निवडणुकीसाठी सक्रिय झाल्या असल्याचे सर्वप्रथम निदर्शना आले होते. मात्र फक्त भाजपच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या असल्याचे समजते तर भाजपच्या प्रचारासाठी त्या मेळघाट अचलपूर तिवसा आणि दर्यापूर सह इतर मतदारसंघातील त्यांचे दौरे सुरू आहेत. यावेळी दर्यापूर मतदारसंघात चांगला नवीन चेहरा देण्याचा त्यांचा मानस आहे तर हा नवीन चेहरा कोण असणार आहे याबाबत जाणून घेऊया…

महायुतीतील घटक पक्ष असलेला एकनाथ शिंदे यांचा शिवसेना या पक्षाकडून कॅप्टन अभिजीत अडसूळ हे या मतदारसंघात सक्रिय झाले होते मात्र त्यांचा पार्सलचा वाद थांबता थांबेना त्यामुळे या मतदारसंघात आता भाजप कडून नवीन उमेदवार देणार असल्याचे समजते तर नवीन उमेदवारांमध्ये सुनीत घोडेस्वार यांचेही नाव घेतल्या जात आहे तर सुनीत घोडेस्वार हे मागील पाच वर्षा अगोदरही या मतदार संघात निवडणुकीसाठी तयारी करत होते. मात्र यावेळेस त्यांना संघटनेकडून संधी मिळणार असल्याचे बोलले जाते तर राजकारणातील फ्रेश चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे सुनीत घोडेस्वार या मतदार संघात संधी देते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: