Monday, December 30, 2024
Homeराज्यरामटेक | ८ ऑक्टोबर २०२४ भव्य धरणे आंदोलन...

रामटेक | ८ ऑक्टोबर २०२४ भव्य धरणे आंदोलन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक :- राज्यातील सर्व विभागाकडील केलेल्या विकासांच्या कामांचे कंत्राटदार , सुबे अभियंता, मजुर संस्था, व विकासक यांचे ४० हजार कोटींचे देयके गेल्या चार पाच महिन्यापासून मिळत नाही व प्रलबिंत आहेत.

यामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंधारण विभाग, नगरविकास, जलसंपदा काम करणारे जवळपास ३ लक्ष कंत्राटदार यांच्या वतीने व त्यावर अवलंबून असणारे अनेक लाखो घटकांची आर्थिक व मानसिक परीस्थिती गंभीर व्यवस्थेत आहे.

यामुळे या सर्वानी राज्यातील सर्व ३५ जिल्हा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय समोर मंगळवार दि ८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत भव्य लाक्षणिक आंदोलन होणार आहे, शासनाकडे महत्त्वाचे पाच मागणी पत्र आतापर्यंत दहा वेळा निवेदन दिले आहे, परंतु शासन कायम या विषयाकडे दुर्लक्ष करीत आहेत,

येत्या ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास त्याच दिवशी फार मोठा निर्णय शासनाच्या विरोधात घेतला जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना राज्य अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पत्राद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: