Saturday, December 21, 2024
HomeBreaking Newsतर अमरावती विधानसभा मतदार संघात महायुतीची मैत्रीपूर्ण लढत होणार?...

तर अमरावती विधानसभा मतदार संघात महायुतीची मैत्रीपूर्ण लढत होणार?…

अमरावती विधानसभा मतदार संघात महायुतीत सध्या आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात महायुतीतील तिन्ही पक्षाकडून आपली दावेदारी दाखल केली असून तिन्ही पक्ष यावेळी मैत्रीपूर्ण लढणार असल्याची तयारी असल्याचे सध्याच चित्र आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते नानकराम नेभनानी यांनी तिकीट मिळो अथवा न मिळो तरी या मतदार संघात उभ राहण्याची तयारी दर्शविली असल्याने आता या मतदार संघात रंगतदार लढत होणार असल्याचे समजते. नानकराम नेभनानी हे नाव सध्या अमरावती शहरातील सर्वात मोठ नाव असून या नावाचा धसका महायुतीतील काही पक्षांनी घेतला होता.

एवढच काय तर आधी या मतदार संघात इच्छुक असणारे काही उमेदवार एक पाऊल मागे सरकले असून त्यांच्या नावाची चर्चाही बंद झाल्या आहेत. या मतदार संघावर महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचा दावा असल्याने विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे राजकीय तज्ञ सांगतात. मात्र भाजप कडूनही सध्या दोन-तीन नाव चर्चेत आहेत त्यापैकी एक नाव म्हणजे माजी आमदार जगदीश गुप्ता हेही इच्छुक उमेदवाराच्या यादीत असून त्यांना पक्षाकडून तिकीट मिळो अथवा न मिळो ते निवडणूक लढू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे.

तर याच मतदार संघात प्रबळ दावेदारी दाखल करणारा महायुतीतील दुसरा घटक पक्ष शिवसेना शिंदे असून, या पक्षाला हा मतदार संघ सुटणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, त्यासाठी अजुनही प्रयत्न सुरु आहेत. मात्र येनवेळी जर राष्ट्रवादीला गेला तरी शिवसेनेकडून नानकराम नेभनानी निवडणूक लढविणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नानकराम नेभनानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या मतदार संघाची संपुर्ण देवून हा मतदार संघ कसा जिंकू शकतो याबाबत त्यांनी सांगितले. तर या मतदार संघाच्या तिकिटासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या मतदारसंघात बर्याच प्रमाणात हिंदी भाषिक असल्यामुळे महायुतीकडून सिंधी समाजाला प्राधान्य देणार असल्याचे समजते तर सिंधी समाजाचे नानकराम नेभनानी शिंदे गटाचे प्रबळ दावेदार मानले जातात. त्यामुळे या मतदार संघाची त्यांना उमेदवारी मिळू शकते. जर नाही मिळाली तरी शिवसेनेकडून नानकराम नेभनानी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवू शकतात.

सध्या हा मतदार संघ कॉंग्रेसचा गढ समजल्या जात आहे, मात्र महायुतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असल्याचे समजते. भाजप या वेळी महायुतीचा धर्म पळणार असल्याने हि जागा अजित पवार यांच्याच पक्षाला देणार असल्याने जगदीश गुप्ता यांची कोंडी होणार आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश गुप्ता हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात. सुलभा खोडके राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असल्याने त्यांना राष्ट्रवादी तिकीट देणार असल्याचे समजते तर शिवसेनेकडून नानकराम नेभनानी लढणार आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: