Wednesday, October 16, 2024
Homeराज्यनगरपरिषद रामजी महाजन देशमुख विद्यालय डिजिटल...

नगरपरिषद रामजी महाजन देशमुख विद्यालय डिजिटल…

रामटेक – राजु कापसे

नगर परिषद रामटेक द्वारे संचालित रामजी महाजन देशमुख नगरपरिषद विद्यालयांमध्ये डिजिटल शिक्षण सुरू झाले. वर्ग 5ते 10 करिता 9 वर्ग खोल्या मधे 9 डिजिटल बोर्ड लागलेला आहे. विद्यार्थी डिजिटल शिक्षणा सोबत जगातील माहित एका क्लीक बटन वर पाहत आहेत. प्रत्येक वर्गात वाचन कोपरा, गणित कोपरा आणि भाषा कोपरा असून विद्यार्थी सुट्टीच्या कालावधीत ज्ञानग्रहण करत असतात.

प्रत्येक वर्गाच्या दर्शनी भागात वर्ग शिक्षकाचे फोटोसह बॅनर लावण्यात आलेले आहे. प्रत्येक वर्गात शैक्षणिक साधन म्हणून विविध माहिती आणि विषयांचे बॅनर तसेच इंग्रजी आणि मराठी मध्ये लिहिलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार लावलेले आहेत.
प्रत्येक वर्गाची रंगरंगोटी कोटिंगसह झालेली आहे.

शाळेत अटल ट्विंकलिंग लॅब, एपीजे अब्दुल कलाम लॅब, आयसीटी लॅब व रोबोटिक लॅब उपलब्ध असून विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष शिक्षक नियुक्त केलेले आहे. या शाळेत रेन हार्वेस्टिंग, सोलर एनर्जी आणि कंपोस्ट खत तसेच परसबाग प्रकल्प राबवण्यात येतात. शाळेत सिसिटीवी लागलेले आहेत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शालेय वाचनालय आहे. विद्यार्थी सुट्टीच्या कालावधीत पुस्तक वाचतात. विविध स्पर्धा आणि शासनाची विविध उपक्रम यामध्ये शाळा नेहमीच पुढाकाराने भाग घेत असते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या स्पर्धेत सुद्धा हिरीरीने भाग घेतलेला आहे.

वर्गात डिजिटल बोर्ड आणि विविध प्रकारच्या लॅब असणारी शहरातील एकमेव शाळा आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेच्या कालावधीत गटशिक्षणाधिकारी माननीय विजय भाकरे आणि मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी शाळेला भेट दिली आहे. शाळेची स्वच्छता रंगरंगोटी शिस्त आणि शिक्षण याबद्दल गौरवोद्गार काढले.

18 सप्टेंबरला पंचायत समिती रामटेक तर्फे रामटेक तालुका सर्व आणि मौदा तालुक्यातील काही मुख्याध्यापकांची सहविचार सभा शाळेत घेण्यात आली त्या दरम्यान सर्व मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये झालेल्या अमुलाग्र बदलाचे कौतुक करून निरीक्षण केले. शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर मिलिंद चोपकर यांनी सांगितले की आमदार आशिष जैयवाल, सर्व शिक्षक, प्रशासनाचे सहकार्य व शासनाचे आर्थिक मदत यामुळे आम्ही शाळा चांगली करू शकलो.

शाळा सुंदर तयार करण्या करिता मंगला पोटभरे, ललित टेंभरे, विजय लांडगे, मुकेश भेंडारकर, संदीप दामेदर, मीना खोडके, रूपाली गवई, दीपक बांगडकर, प्रकाश उके, स्वाती खैरकर, मंदा हडपे, स्वाती जांभुळे, मीनाक्षी खैरकर, उन्नती अँथोनी, सुनील पवार सहित आदिनी पर्यत्न केले.

काय म्हणतात नगरपरिषद मुख्याधिकारी

नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत म्हणाल्या की नगरपरिषदची रामजी महाजन देशमुख शाळा इंग्रजकालीन शाळा 142 वर्ष पूर्विची म्हणजे स्थापना 1882 ची आहे. शाळेचे गत वैभव तसेच राहावे म्हणून शाळा तसीच ठेवली आहे. ही शाळा वाडा पॅटर्नची आहे. इंग्रजकालीन रामटेक मधील प्रथम शाळा आहे. शाळेच्या नविनीकरणासाठी 17 लाख रुपये मंजूर करण्यात आले. काही साहित्य जिल्हाधिकारी व सीएसआर फंड मधून मिळाले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: