Wednesday, October 16, 2024
Homeराज्यराष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची औंढा येथे महत्त्वाची बैठक संपन्न...

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची औंढा येथे महत्त्वाची बैठक संपन्न…

हिंगोली – गोपाल सातपुते

शासकीय विश्रामगृह औंढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाच्या ओबीसी विभागाची बैठक राष्ट्रवादीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सिताराम जवळे पुसेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष विकी देशमुख यांच्या नेतृत्वात 2 ऑक्टोंबर रोजी पार पडली यावेळी अनेकांच्या निवडी देखील करण्यात आल्या यावेळी वसमत तालुक्यातील विशाल जाधव यांना राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण दादा आखाडे हे हिंगोली जिल्ह्यात 7 ऑक्टोबर रोजी येणार आहेत त्यासाठी पूर्वतयारी बैठक पार पडली व त्यांच्या दौऱ्यात ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती जास्तीत जास्त संख्येने दर्शवावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सिताराम जवळे पुसेगावकर यांनी सांगितले

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष हिंगोली विक्की देशमुख अमोल गीते विजय सांगळे प्रसाद राऊत जगन्नाथ सांगळे शुभम सांगळे कल्पेश पोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: