Monday, December 30, 2024
HomeBreaking Newsअमरावती | आमदार रवी राणा आणि तुषार भारतीय एकाच मंचावर…मंचावर काय घडलं?...

अमरावती | आमदार रवी राणा आणि तुषार भारतीय एकाच मंचावर…मंचावर काय घडलं?…

अमरावती : राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा कोणी कोणाचा मित्र नसतो. पण एरवी एकमेकांच्या विरोधात रान उठवणारे रवी राणा आणि तुषार भारतीय हे एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर दिसून आल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे तर तुषार भारतीय यांनी भाषणात दरम्यान राजकीय चिमटे काढल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे…

बडनेरा विधानसभेतील महायुती कडून संभाव्य उमेदवार असलेल्या रवी राणा आणि तुषार भारतीय हे काल एकाच मंचावर दिसल्याने शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखल्या जाणारे रवी राणा आणि तुषार भारतीय हे नेहमीच एकमेकांवर राजकीय चिखलफेक करतांना दिसतात विशेष म्हणजे रवी राणा आणि तुषार भारतीय यांना एकमेकाची सावली सुद्धा सहन होत नाही, मात्र एकाच मंचावर दिसल्याने विविध चर्चेला उधान सुरु झाले आहे. निमित्य होते ते गडगडेश्वर येथील शिवपुराण कार्यक्रम. शिवपुराण या कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणावेळी दोन्ही नेते मंचावर उपस्थित होते. यावेळी तुषार भारतीय यांनी भाषणादरम्यान रवी राणा यांच्यावर ताशेरे ओढल्याचे बघायला मिळाले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: