Monday, December 30, 2024
Homeराज्यभव्य रक्तदान शिबिराचे थाटात समापन…२२ रक्तदात्यांनी केले इच्छुक रक्तदान…

भव्य रक्तदान शिबिराचे थाटात समापन…२२ रक्तदात्यांनी केले इच्छुक रक्तदान…

राजु कापसे
रामटेक

जवळील बोरडा (सराखा) येथे एकता युवा गणेश मंडळ यांच्यावतीने गट ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेकांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला सहकार्य केले.

दरवर्षी बोरडा येथे मस्कऱ्या गणपतीची स्थापना गावातील मुख्य चौकात करण्यात येत असते.मंडळातील सदस्य दरवर्षीच काहींना काही स्तुत्य उपक्रम या अनुषंगाने राबवित असतात.याच हेतूने एकता युवा गणेश मंडळाच्या वतीने दि.२८ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत परिसरात अमन ब्लड सेंटर,नागपूर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर पार पडले.या समाजसेवी कार्याला गावातील सरपंचासहित इतरही अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत २२ रक्तदात्यांनी इच्छुक रक्तदान केले.या सर्व कार्यामुळे बोरडा येथील तरुण युवकांची चर्चा परिसरात होतांना दिसून येत आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र डडमल,पराग गजबे,प्रमोद गजबे,नरेश चौधरी,अतुल गजबे,तुळशीदास राऊत,धीरज सोनवाने, पंकज गजबे,निकेश ठाकूर,आकाश लांजेवार यांचे विशेष सहयोग लाभले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: