Thursday, October 17, 2024
Homeकृषीशेतकऱ्यांनी अधिकच्या नुकसान भरपाईसाठी दुसऱ्यांदा विमा कंपनीस पूर्वसूचना देण्याचे आवाहन...

शेतकऱ्यांनी अधिकच्या नुकसान भरपाईसाठी दुसऱ्यांदा विमा कंपनीस पूर्वसूचना देण्याचे आवाहन…

महेंद्र गायकवाड
नांदेड
माहे सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवडयात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली ही एक आपत्ती घटना मानली जाते. त्याअनुषंगाने यानंतर जर पुन्हा मोठा पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास लाभार्थी पुन्हा विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ शकतात. जेणेकरुन संबंधित लाभार्थ्यांना अधिकची नुकसान भरपाई नुकसानीच्या प्रमाणात मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दुसऱ्यांदा पूर्वसूचना देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जर 25 टक्के पेक्षा पूर्वसूचना येत असतील तर अशा ठिकाणी लागू व्हायची नियमावली ही विमा कंपनीकडून बदलण्यात आलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा समितीने 25 टक्के अग्रीम देण्यासाठी मध्यावधी नुकसान अर्थात मीड सीजन ॲडव्हर्सिटी अधिसूचना लागू केलेली आहे. त्यामुळे या कालावधीत झालेल्या नुकसानीचे वैयक्तीक पंचनामे हे वेगळे करण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र या सर्व शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई लागू झाल्यास अदा केली जाईल.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: