अडीच महिन्यापासुन प्रवेश नाही मिळाला…
राजु कापसे
रामटेक
रामटेक : यावर्षी वर्ग 11 वी विज्ञान करिता प्रवेश फेरी 1 जुलाई 2024 पासुन सुरुवात झाली आहे। निकाल चांगला जास्त लागल्याने नामाकिंत शाळेच्या निर्धारित अनुदानीत कोटा लवकरच पूर्ण झाला। अतिरिक्त शेकडो विद्यार्थ्यानी आपला फार्म रामटेक तहसील मधील विज्ञान विभागाच्या जूनियर शाळेकडे प्रवेश करिता भरला आहे। परंतु अजुन पर्यन्त अडीच महीने लोटून सुद्धा शिक्षणाधिकारी नागपुर, डेप्युटी डायरेक्टर नागपुर, शिक्षण संचालक, पुणे या शिक्षण विभागाची लापरवाही मुळे परमिशन मिळाली नाही। किवा उत्तरहि मिळाले नाही। त्यामुळे शेकडो विद्यार्थ्याचे भविष्य टांगनिला लागले आहे। या मुळे विद्यार्थी व पालक यांचे मधे भारी आक्रोश आहे. यांचा भारी त्रास शाळेच्या व्यवस्थापनाला होत आहे। विद्यार्थी व पालक वारंवार शाळेच्या व्यवस्थापनाला एडमिशन करिता विचारत आहेत.
मागील दोन वर्षापासून एक गंभीर समस्या शिक्षण विभागाने निर्माण केली आहे। विज्ञान विभागाच्या क्षमतेनुसार प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी प्रवेशा पासून वंचित राहतात. कोणिही विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या विषयापासून वंचित राहू नये म्हणून सर्व शिक्षण संस्था अतिरिक्त जागेची परवानगीसाठी शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद, नागपूर यांचेकडे अर्ज करायचे. शिक्षणाधिकारी रामटेक तालुक्यातील सर्व शाळेच्या विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याची खातरजमा केल्यानंतर वाढीव जागा विद्यार्थ्याचे व पालकाचे हित लक्षात घेता यथाशिघ्र मंजूर करायचे.
परंतू मागील दोन वर्षापासून ही प्रक्रिया प्रशासनाने जास्त किचकट केली आहे। आता मागील दोन वर्ष्या पासुन प्रथम शिक्षणाधिकारी नागपुर याना शिक्षण संस्थानी वाढीव जागेकरीता अर्ज करवा लागतो। शिक्षणाधिकारी नागपुर हे डेप्युटी डायरेक्टर नागपुर याना पाठवतात।डेप्युटी डायरेक्टर हे शिक्षण उपसंचालक, पुणे याना पाठवीतो। परत असाच प्रवास सुरु होतो। या वर्षी निषकाळजी पणा आणि दिरंगाईची हद्द झाली। अडीच महीने लोटून अजुन परवानगी आली नाही। जो पर्यन्त परवानगी येत नाही तो पर्यन्त विद्यार्थ्याना प्रवेश द्यायचा नाही असा शिक्षण विभागाचा नियम आहे। जर चुकुन विद्यार्थ्याना प्रवेश दिला तर शाळावर दंडात्मक कार्रवाईचा आणि विद्यार्थी प्रवेश पत्र नाकारण्यात येईल असा शिक्षण विभागाचा आदेश आहे।
ज्यामुळे शाळा, पालक आणि विद्यार्थी यांना अतोनात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. अगोदर होत असलेली शिक्षणाधिकारी ते शाळा ही प्रक्रिया आता शाळा, जीप शिक्षणाधिकारी, डेप्युटी डायरेक्टर, शिक्षण संचालक, पुणे. पुन्हा परत डेप्युटी डायरेक्टर- शिक्षणाधिकारी-शाळा अशी केल्या गेली असून या प्रक्रीयेस बराच विलंब होत आहे।
अनेक पालक नागपूर शहरात पाल्याला शिकविण्यास असमर्थ असतात ते त्याना रामटेक शहरात प्रवेश हवा असतो।
रामटेक समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव ऋषिकेश कीमतकर म्हणाले की पालक व विद्यार्थि प्रवेश करिता वारंवार शाळेत फेऱ्या मारित आहेत। शाळेजवळ यांचे निश्चित उत्तर नाही. अश्या विद्यार्थ्याचा प्रवेश प्रक्रियेत अडीच महिने विलंब झाला आहे. यात विद्यार्थी यांचे आतोनात नुकसान आहे। सायन्सच्या विद्यार्थ्यांना ताबडतोब न्याय देण्याची मागणी सर्व पिडीत पालकांनी केली आहे .
याला जबाबदार कोन : विद्यार्थ्यांना ताबडतोब न्याय देण्या करिता रामटेक पंचायत समितिचे गटशिक्षण अधिकारी विजय भाकरे याना विचारना केली असता ते म्हणाले की अतिरिक्त जागा परवानगी करिता जीप माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे कड़े अर्ज करावा लागतो। पालक म्हणाले की शासनाचे प्रतिनिधि गटशिक्षण अधिकारी परवानगी करिता पर्यत्न का करीत नाहित। विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहे का? प्रशासन गरीब विद्यार्थ्यांना न्याय देईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक जनप्रतिनिधी सुद्धा या बाबत गप्प आहेत हे विशेष.