महेंद्र गायकवाड, नांदेड
सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मालमत्ता विभागामध्ये अनेक गैरप्रकार होत असून या सर्व प्रकारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जसबीरसिंघ बुंगई व मनिंदरसिंघ रामगडिया यांनी गुरुद्वारा बोर्ड प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली आहे.
तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या अधिपत्याखाली नांदेड जिल्हाभरात भरपूर मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्तांचे देखभाल व दुरुस्ती व कारभार बोर्डाच्या मालमत्ता विभागाकडे आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तामध्ये अनेक गैरकारभार होत असल्याचा आरोप जसबीरसिंघ बुंगई व मनिंदरसिंघ रामगडीया यांनी केला आहे. नांदेड शहरांमध्ये मध्यवर्ती रेल्वे स्टेशननजीक गुरुद्वारा बोर्डाचा पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे. हा पेट्रोल पंप किरायाने दिला गेला आहे.. पेट्रोल पंपाच्या व्यवहाराच्या हिशोबाने 18 लाख रुपये जीएसटी ची रक्कम भरणे क्रमप्राप्त असताना ही रक्कम भरण्यात आली नसून गुरुद्वारा बोर्डातील मालमत्ता विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी केवळ नऊ लाख रुपये रक्कम भरणा केली आहे.
नवा मोंढा नांदेड येथील शंभर 100 X 150 साईजचा प्लॉट एका खाजगी ट्युशनसाठी दिला असून दरमहा 40 हजार रुपये नुकसान होत आहे. सदर प्लॉट हा शीख धर्मातील विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस देण्याच्या बोलीवर देण्यात आला होता पण तसे होताना दिसत नाही. याचप्रमाणे काही मोजके चार ते पाच व्यक्तींना गुरुद्वारा बोर्डाच्या मालकीचे सात ते आठ दुकाने 70 लाख रुपयांत विक्री केली आहेत. हे सर्व प्रकार मालमत्ता विभागाला माहित आहेत परंतु विभागातील कर्मचारी यात सामील असल्याने गुरुद्वारा बोर्डाचे नुकसान होत आहे. गोविंदबाग येथील एक दुकान मालमत्ता विभागाने एकास किराणे दिले होते त्या व्यक्तीचा दोन वर्षाचा किराया माफ करण्यात आला आहे . विशेष म्हणजे कोणताही किराया माफ करण्याचे अधिकार गुरुद्वारा बोर्डाला नाहीत महत्त्वाचे म्हणजे शीख धर्मातील अनेक बेरोजगार युवक असताना त्यांना ही दुकाने दिल्या गेलेले नाहीत किंवा गोरगरीब शिख युवकांचे किराया कधीही माफ केलेला नाही.
गुरुदाबोर्ड मालमत्ता विभागाच्या गैरकारभारामुळेच यापूर्वी रेल्वे स्टेशन परिसरातील गुरुद्वाराच्या बोर्डाच्या जमिनीवर सुरू असलेल्या नुमाइन/प्रदर्शनासाठी दिलेल्या जागेमध्ये 20 ते 25 लाख रुपये बोर्डाचे नुकसान झाले आहे. त्यासाठी गुरुद्वारा मालमत्ता विभागातील काही कर्मचाऱ्यांनी 2 ते 3 लाख रुपये लाचेच्या रुपात घेतल्याचा आरोपही निवेदनात केला असून आहे. या निवेदनावर जसबीरसिंघ बुंगई, मनिंदरसिंघ रामगडिया यांच्यास मनबिरसिंघ ग्रंथी , बीरेंद्रसिंघ बेदी, जगजीतसिंघ खालसा , करणसिंघ लोणीवाले , हुकुमसिंघ काराबिन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.