Saturday, December 21, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर येथे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात…

मूर्तिजापूर येथे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात…

मूर्तिजापूर येथे 18 सप्टेंबर ला भारतातील प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन वारकरी मंडळी व आनंद उर्फ पिंटू वानखडे व मित्र परिवारच्या वतीने शिवाजीनगर येथील जिल्हापरिषद शाळेच्या ग्राउंड मध्ये आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी 4 वाजता सुरु होणार असून सायंकाळी 7 वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमा करिता किमान 10 हजार नागरिक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम वेळेवर सुरु होणार आहे.

कार्यक्रम स्थळी सभामंडपाची वेवस्था व इतर व्यवस्था पाहण्याकरिता वारकरी मंडळी सह रा. कॉ जिल्हाअध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांच्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर ला दुपारी 4 वाजता करण्यात आली व या कार्यक्रमा करिता जास्तीत जस्त नागरिकांनी उपस्तिथ राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक मूर्तिजापूर येथील वारकरी मंडळी व आनंद उर्फ पिंटू वानखडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले …

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: