रामटेक दि.16/
रामटेक विधानसभा मदारसंघातील रामटेक, पारशिवनी व मौदा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे धान विक्रीचे पैसे नगरधन अग्रो इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड कडून मागील दोन वर्षापासून मिळालेले नव्हते. पिडीत सर्व शेतकऱ्यांनी ही माहिती आमदार आशिष जयस्वाल यांना सांगितली. यानुसार आ.आशिष जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे थकीत सुमारे दोन कोटी रुपये नगरधन अग्रो इंडस्ट्रीज प्रा.लिमिटेडच्या मालकाकडून मिळवून दिले. दि.16 सप्टेंबर रोजी
धान विक्रीचे पैसे परत मिळवून दिल्याबद्दल तसेच नुकतेच आमदार जयस्वाल यांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबददल त्यांच्या रामटेक येथील कार्यालयात जाऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गेंदलाल कुरडकर, रणवीर वाडिभस्मे, प्रकाश भोयर,सुरेश पाटील, लाहानु गिरी,सुरेश देशमुख, निलेश देऊरकर, राजहंस काळे, जगण आकरे, लक्ष्मण जुत्तीगा,सुनिल ठाकरे, ज्ञानेश्वर खंदारे, शिवा येळणे यांच्यासह केरडी,चाचेर, आष्टी,बनपुरी,नगरधन, बार्शी, कुशरी,तारसा,निमखेडा (गो.पा.) येथिल शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.