बल्लारपूर,
नवयुवकांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये आवड निर्माण व्हावी तसेच मन, मनगट आणि मस्तीकाचा उपयोग सशक्त समाज निर्मितीसाठी व्हावा याकरिता परंपरागत आखाड्यांचा संवर्धन आवश्यक असल्याचे प्रतिपादन ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
स्थानिक साईबाबा ज्ञानपीठ येथे क्रीडा क्षेत्रातील तसेच आखाड्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित संवाद सभेत ते बोलत होते या प्रसंगी माजी नगराध्यक्ष लखन सिंह चंदेल हरीश शर्मा समीर केने रवी मारवाह गणपतराव उपरे राकेश सोमानी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी परंपरागत आखाड्यांच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत आखाड्यांची पाहणी करून त्यांच्या विकासा करिता आवश्यक असलेल्या बाबींचे तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर केने यांनी तर संचालन वआभार प्रदर्शन राकेश सोमानी यांनी केले.
याप्रसंगी शहरातील सर्व आखाड्यांचे प्रमुख, महिला गोविंदा पथकाच्या युवती तसेच विविध व्यायाम शाळेतील युवकांनी मोठ्या संख्येने घेतलेल्या सहभागामुळे संवाद सभा यशस्वी ठरली.