राजु कापसे प्रतिनिधी
रामटेक :- शेतकरी मित्रांनो आजूनही तुम्ही ई-पीक नोंदणी केली नसेल तर माहिती तुमच्यासाठी खूप मोलाची होणार आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ई-पीक नोंदणी करण्यासाठी ७ दिवसाची मुदत वाढ करण्यात आली आहे. दिनांक २३ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना करता येणार ई-पीक नोंदणी.
शेतकऱ्यांनी शेतात घेतलेल्या आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारावर करण्याकरिता तसेच शासकीय अनुदान असेल किंवा पिक विमा असेल या योजने चा लाभ मिळवण्यासाठी व पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारावर करणे आवश्यक आहे. यामध्ये एक ऑगस्ट पासून ई पीक नोंदणी सुरुवात झाली परंतु यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे तसेच अतिवृष्टीच्या परिणामामुळे आपल्या पिकाची ई पीक नोंदणी करता आलेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेले आहे.
खरीप हंगाम २०२४-२५ करिता शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी १ ऑगस्टपासून सुरुवात झाली. १५ सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करता येणार होती. परंतु, राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाने शेतकरी स्तरावरील या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
ई-पीक नोंदणी मुदत वाढ
शेतकरी मित्रांनो २०२४-२०२५ खरीप हंगामात ई-पीक नोंदणी करण्यासाठी दिनांक १५ सप्टेंबर अंतिम तारीख दिली होती. मात्र, त्यात ७ दिवसाची मुदत वाढ करण्यात आली असून दिनांक २३ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
याचबरोबर, तलाठी स्थरावरील ई-पीक नोंदणी करण्यासाठी मुदत ७ दिवसाने वाढवली असून, दिनांक २४ सप्टेंबर ते २४ ऑक्टोंबर पर्यंत तलाठी स्थरावर ई-पीक नोंदणी तपासणी होणार आहे.