बाळापूर – सुधीर कांबेकर
बाळापूर : तालुक्यातील कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) ह्यापाटबंधारे विभगाच्यावतीने निर्माणकरण्यात आलेल्या लघुसंग्राहक प्रकल्पामध्ये प्रकल्पाच्या पूर्व व पश्चिमबाजूला असलेले रस्ते पाण्याखालीबुड़ाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातजाण्यासाठी रस्तेचनाहीत. परिणामीशेती वहिती तसेच मशागत तसेचशेतमाल घरी आणण्यासाठी रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रशासनाने नवीन रस्ते द्यावेत, अशी मागणीकारंजा, नया अंदुरा येथील शेतकऱ्यांनी गुरूवारी बाळापूर तहसीलदारांना दिलेल्या निवेद्नाद्वारे केलीआहे.
कारंजा, नया अंदुरा येथील शेतकऱ्यांनी प्रकल्पात बुड़ालेल्या रस्त्याबाबत यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री,आमदार, जिल्हाधिकारी, पाठबंधारे विभाग, तहसीलदार बाळापूरआदीच्या सन २०१९, २০२০, २०२१ , २०२२ , २०२३ , पासून सातत्याने निवेदन देवुन ही नवीन रस्तेदेण्याबाबत शेतकयांनी मागणी केलीआहे. परंतुअद्यापपर्यंतही शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यामुळे पुन्हा निवेदन सादर करण्यात येत असल्याचेही निवेदनात म्हटलेआहे. या निवेदनावर रामराव नागे,मनोहर तायडे, संजय भिसे, गोविंद तायडे, दलालधन तायडे, एकनाथ नागे, सोपान तायडे, नामदेव तायडे,पवन नागे, सागर तितरे, ज्ञानदेव भोजने, गौरव तायडे, देविदास बोळे, पत्रकार रमेश ठाकरे आदीसह कारंजा, नयाअंदुरा येथील अनेक शेतकऱ्यांच्या सहयाआहेत.