Mahavoice Impact :मुर्तिजापूर तालुक्यात रेशन माफीया यांनी हैदोस घातल्याची बातमी महाव्हॉइस न्यूज ने प्रसारित करताच पोलीस प्रशासन सतर्क झाले. तर कालच ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. गावखेड्यात ग्रामीण पोलिसांनी आपली गस्त वाढविली आहे. अशातच काल स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील मोझर फाट्याजवळ सापळा रचला असता वाशिम जिल्ह्यातील दोन जण शासकीय धान्य तांदूळ गव्हाच्या कट्ट्यासह दोन जाळ्यात अडकले आहे. यावेळी त्यांची झडती घेतली असता शासकीय धान्य वितरण मधील तांदूळ व गहू ऑटोसह जप्त करून दोघं आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कालच महाव्हाईस न्यूजने प्रशासनाच्या नाकावर टिचून तांदूळ माफिया काळाबाजार करीत असल्याचे व्हिडिओ बातमी प्रसारित केली होती. यामध्ये शहरातील एक माफिया खुलेआम ग्रामीण भागात तांदूळ खरेदी करतांना व्हिडीओ दिसल्याने पोलीस प्रशासन जागे होऊन त्याच बातमीचा इम्पॅक्ट म्हणून काल ग्रामीण पोलीस यंत्रणा कामाला लागली लागली होती अशातच तालुक्यातील मोझर फाट्याजवळ वाशिम जिल्ह्यातील दोन जण शासकीय धान्य व तांदूळ गव्हाच्या कट्ट्यासह जाळ्यात अडकले त्यांच्याकडून शासकीय धान्य वितरित मधील तांदूळ व गहू आढळून आला.
तर त्या दोघा आरोपीस काल शहर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन ऑटोसह किंमत तीन लाख असा एकूण 3 लाख 19 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी दानिश अमीर फकीरवाले वय वर्ष 20 जावेद इमान कलरवाले वय वर्ष 45 हे दोन्ही राहणार कोळंबी तालुका मंगळूर जिल्हा वाशिम येथील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले.तर पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रडके करीत आहे