Saturday, December 21, 2024
Homeराज्यपातुर येथे प्रसिद्ध कवि शायर गीतकार शकील आज़मी यांचा सत्कार...

पातुर येथे प्रसिद्ध कवि शायर गीतकार शकील आज़मी यांचा सत्कार…

पातुर – निशांत गवई

भारत देशाचे प्रसिद्ध कवि शकील आज़मी,आजमगढ़ (उत्तर प्रदेश) यांचा पातुर येथे साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध साहित्य कवी लेखक यांच्यावतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला आहे. या स्वागत सत्कार समारंभाचे आयोजन 7 सप्टेंबर 2024 रोजी अकोला वाशिम रोड वरील कॉलिटी धाब्याचे सभागृहात करण्यात आले होते.

जगप्रसिद्ध शायर शकील आजमी हे बाळापुर येथील त्यांचे कवी सम्मेलनचा कार्यक्रम झाल्यानंतर बाळापुर येथून नागपुर कड़े पातुर मार्गे जात अस्ताना क्वालिटी धाब्यावर एका सभागृहामध्ये पातुर शहरातील साहित्यिक, लेखक, कवि यांच्या कडून सत्कार करण्यात आला. यावेळी अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक प्रसिद्ध साहित्यिक कलावंत देवानंद गहिले यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे सचिव साजीद खान पठान,शारीक सर बालापुर, परवेज़ खान आरजु़, मुखतार सर,कवि नईम फराज़, सरपंच शब्बीर भाई, बब्बूभाई, मो शारीक सह साहित्यिक, लेखक,कवी उपस्थित होते.

वेदनेतून साहित्य जन्माला येते यावेळी पातुर येथील ज्येष्ठ साहित्यिक देवानंद गहिले यांनी प्रसिद्ध गीतकार शकील आजमी यांच्याशी संवाद साधून मुलाखत घेतली. प्रसंगी दिलखुलास चर्चा झाली यातून श्री गहिले यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देत शकील आजमी यांनी वेदनेतून साहित्य जन्माला येते असे प्रकट भाव यावेळी बोलताना व्यक्त केले.
तसेच शकील आज़मी यानी आपल्या जिवनाशी थोडक्यात माहिती देतानां सांगितले की मुंबईत मुंबई गुजरात उड्डाण पुला खाली २० वर्ष फुटपाथ वर रात्री झोपलो व याच फुटपाथ वर जीवन जगताना त्यावेळी एक शेर लिहला की !

कमा के पुरा किया
जितना भी खसारा था!
वहीं से जीत के निकला
जहां से मैं हारा था!

या नंतर ते म्हणाले की माझ जिवन अतिशय दारिद्रय खाली गेले
बालपणीच आईचे निधन झाले
पुढील शिक्षण घेता आले नाही माझे शिक्षण गावातच
५ वी पर्यंत झाले
परतूं मी जीवनात हार मानली नाही यातूनच शायरी ची जीद्द सोडली नाही
राज्य व देश पातळीवर २५ अवार्ड मिळाले
अनेक पुस्तकें लिहले
बॉलीवूडमध्ये गीत दिले
आज मी अमेरिका , कॅनडा आस्ट्रेलिया, थायलैंड, दुबई, शारजहां, आबुधाबी, सऊदी अरब, मस्कट,कुवैत, बहरीन,श्रीलंका, नेपाळ सह जगाचे साहित्य शायरी शिखर वर पोचलो
व आज मी देशा सह जगात फिरतो आहे
असे बोलताना पुन्हा त्यांना विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी
आपल्या प्रगती वर
चारोळी काव्यातून त्यांनी उत्तर दिले

वह भी एक दिन था की फुटपाथ पर बे दाम बीके!
आज शोरुम में रखें सामान हैं हम !

म्हणजेच माणसाच्या मनात जिद्द चिकाटी आणि महत्त्वकांक्षा असेल तर मनुष्य जीवनामध्ये प्रगती करू शकतो
हे प्रसिद्ध गीतकार शकील आजमी यांच्या जीवनाच्या संघर्ष मय मुलाखतीवरून दिसून येते. या मुलाखतीचा समारोप पातुर येथील देवानंद गहिले यांनी सुद्धा एक हिंदी चारोळी शेर गीतकार शकील आजमी यांच्याशी संवाद साधताना सादर केला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: