भद्रावती येथे अ.भा. ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सव साजरा…
मौदा/नागपूर – राजू कापसे
ज्या वयात ज्येष्ठांनी आराम करायला हवे त्या वयात स्वतः सामाजिक कार्यात वाहून घेतात. हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असले तरीही अ.भा. ग्राहक पंचायत च्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी तरुणांना सुद्धा या सामाजिक कार्यात संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील शिंदे महाविद्यालयाचे इनडोअर स्टेडियम मध्ये अखिल भारतीय ग्रामपंचायतचे सुवर्ण महोत्सव समापन कार्यक्रम बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
तत्पूर्वी स्वामी विवेकानंद व बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान ग्राहक दर्पण स्मरणिका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्राहक पंचायत, विदर्भ प्रांताचे विज ग्राहक तक्रार निवारण मंच पुणे व नाशिक झोनचे अध्यक्ष अजय भोसरेकर, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, विदर्भ प्रांत प्रसिध्दी प्रमुख तुकाराम लुटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे,
नायब तहसिलदार राहूल राऊत, भद्रावती तालुका अध्यक्ष वामन नामपल्लीवार, जिल्हा संघटक, वसंत वर्हाटे, जेष्ठ मार्गदर्शक, जिल्हा चंद्रपूर पुरूषोत्तम मत्ते, सहसचिव तथा सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर प्रविण चिमुरकर, उपाध्यक्ष, ग्राहक पंचायत, भद्रावती शेखर घुमे तसेच अ.भा. ग्राहक पंचायत चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.