नदी नाल्या काठावरील शेतातून पाणी वाहिल्याने पिकाचे नुकसान…
पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरामध्ये दि 2 रोजी असलेल्या बैल पोळा दिवसी दुपारी सुमारे 1 वा सुमारास मुसळधार पाऊस जवळपास एक तास बरसल्यामुळे, निर्गुणा नदीला महापूर आला असून परिसरातील नाले तुडुंब भरून वाहले, त्यामुळे नदी नाल्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी वाहल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला असून येथील निर्गुणा नदीला जवळपास 20 वर्षानंतर प्रथमच महापूर आल्याने शेकडो नागरिकांनी महापूर बघण्यासाठी नदी तिरावर एकच गर्दी केली होती.सदर पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतपिकातून गेल्याने पिकाचे नुकसान लक्षात घेता शेतकरी चिंतेत सापडला आहे.
तसेच सततच्या पावसामुळे, शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला धरलेल्या शेंगा सततच्या पावसामुळे गळून पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसाणीस सामोरे जाण्याची वेळ आल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून सदर उत्पन्नातुन लागवड खर्च निघणे कठीण झाल्याने रब्बी पिकाची पेरणीची चिंता तसेच घरघुती खर्च तसेच बँक पीक कर्ज या चिंतेने शेतकऱ्यांना अनेक समस्या मोठया त्रास दायक ठरणार आहेत तरी प्रशासनाने वेळीच नुकसान शेतीचा सर्व्हे करावा व सरकारणे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट भरीव आर्थिक मदत द्यावी अशी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.