पातुर – निशांत गवई
पातुर न. प. अंतर्गत इमलीबन कब्रस्तानच्या आवरभीतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप पातुर येथील मो. जैद मो.सईद यांनी २७ ऑगस्ट रोजी पातुर न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे. पातूर येथे गेल्या काही दिवसापासून इमलीबन कब्रस्तानच्या आवारभीतीचे बांधकाम सुरू आहे.
मात्र सदर बांधकाम अंदाजपत्रकानुसार न करता ठेकेदार व संबंधित यांच्या मिलीभगत मुळे मनमानी पद्धतीने करून देयक हडपण्याचा प्रयत्न होत आहे.
वेळेस दखल न घेतल्यास शासनाच्या लाखो रुपये पाण्यात गेले सारखे होईल त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित बांधकाम थांबून निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी,तसेच चौकशी होईपर्यंत संबंधित ठेकेदाराला देयक अदा करू नये असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर तक्रारीवर संबंधित न. प. मुख्याधिकारी काय कारवाई करतात याकडे पातुर वासियांचे लक्ष लागले आहे.
कंत्राटदाराला अभय कोणाचे ?
इमलीबन कब्रस्तानच्या आवारभीतीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार करणे गरजेचे होते. परंतु सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे विशेष म्हणजे तक्रार झाल्यानंतर ही हे बांधकाम सुरू कळत असल्याने संबंधित कंत्राटदाराला अभय कोणाचे आहे. असा प्रश्न पातुर वासीयांकडून उपस्थित होत आहे.
प्रशासनाचा ढसाळ कारभार : लाखोंची उधळपट्टी
कब्रस्तानच्या आवरभीतीचे बांधकाम सुरू असताना संबंधित अधिकाऱ्याकडून वेळोवेळी पहाणी करण्याची गरज असते, मात्र संबंधित अधिकाऱ्याकडूनच पाहणी केली जात नसल्याने लाखो रुपये निधीची उधळपट्टी होत असल्याचे वास्तव आहे.
सामाजिक इमलीबन कब्रस्तान आवरभीतीचे काम अंदाजपत्रकानुसार न करता मनमानी पद्धतीने निष्कृष्ट दर्जाचे होत असून याची तक्रार मुख्याधिकारी नगरपरिषद पातुर यांना केली आहे. मुख्याधिकारी याच्यावर काय कारवाई करते ते पाहून नंतरची दिशा ठरवू.
“मो. जैद मो. सईद”