अकोला : अकोला जिल्ह्यातील रेल येथील प्रसिद्ध श्री रेलेश्वर महादेव संस्थान येथील सभागृहाचे भूमीपुजन अकोला पूर्वचे भाजपचे श्री आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते संपन्न झाला.या संस्थेला संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घुगरे यांच्या आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुरवठा नंतर नुकतच ‘ क ‘ वरगाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे.आमदार रणधीर सावरकर यांनी श्री रेलेश्वर संस्थेचेच्या सभगृहासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.उपलब्ध या निधीतून या ठिकाणी भव्य सभागृहाचे निर्माण करण्यात येणार आहे.
यामुळे येथे वर्षभर साजरा होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी उपयोगी होणार आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकरराव घुगरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री गोपाल इंगळे, विश्वस्त श्री प्रताप मेहसरे, श्री प्रकाश पुंडकरसह गावातीच प्रतिष्टीत नागरिक डॉ. सुधाकर मेहसरे, सरपंच सौ वर्षाताई वानखडे, श्री राजेश नागमते, श्री संतोष शिवकर, उपसभापती पं.स अकोटचे श्री विनोद मंगळे, धारेलचे सरपंच, श्री मंगेश बुले , करोडीचे सरपंच श्री किशोर कुले , केळीवेळीच्या सरपंचा सौ कोमल गोपाल पेटे, माजी जि.प.सदस्य श्री शिवाजी मेहसरे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री शालीकरामजी तेलंगे, श्री शालीकराम बगाडे, श्रीकृष्णा तराळे , श्री संजय घुगरे, रामा आठे, शंकरराव इंगळे, नंदकिशोर इंगळे, गोपाल पेटे, शुभम लोणे, प्रदीप कोल्हे, मोहन कपले , माजी उपसरपंच रेलचे श्री मनोहर मोहन घुगरे, अध्यक्ष शिक्षण समिती रेलच्या सौ दुर्गाबाई ठाकरे, मंगळाबाई झाडे, मिराबाई मेनकार, धनराज मोरे, संजय घुगरे, श्रीकृष्ण तराळे, गणपत अनकुरकार , श्रीकृष्ण घुगरे, ज्ञानु खडसे यासह गावातील प्रतिष्ठित महिषा व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचं सुत्रसंचालन राहुल लिंगोट यांनी केलं..