अकोट तालुक्यातील लाडेगाव येथिल प्रा.प्रविण बोंद्रे हे मागिल अनेक वर्षापासून शैक्षणिक , सहित्यिक व सामाजिक कार्यात उल्लेखनिय कामगिरी करीत आहेत. तसेच संपुर्ण महाराष्ट्रात वृत्तपत्र स्तंभ लेखक म्हणून सुद्धा सुपरिचित आहेत.आजवर प्रा.प्रविण बोंद्रे यांचे देशोनत्ती , लोकमत, मातृभूमी, विदर्भ मतदार, सकाळ, रोजगार नौकरी संदर्भ,
दैनिक विदर्भ केसरी, हिंदुस्थान, दैनीक पुण्यनगरी, माझा स्टूडंट , तसेच ईतर वर्तमानपत्रात व पुणे येथिल मासिकामध्ये दिवाळी निमीत्त लेख प्रसिद्ध झाले आहेत . आतपर्यंत खूप सगळ्या दिवाळी अंकांत खूप सारे लेख प्रसिद्ध झाले आहेत.
एवढेच नाही तर गोंदीया येथे आमगावला झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सुद्धा प्रा.प्रविण बोंद्रे यांना ” उत्कृष्ट शोध निबंध सादर केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. ” तसेच गडचिरोली मधील आलापल्ली येथिल विद्युत महवितरण केंद्राअंतर्गत चालविण्यात येणार्या ई – जर्नल मध्ये पण लेख प्रकाशीत आहेत.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत सुद्धा आजपर्यंत नऊ शोधनिबंध प्रकाशीत आहेत.तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर प्रेरणात्मक , सामाजिक व उद्योजक्ता या विषयावर व्याख्याने पण दिली आहेत. आजपर्यंत व्याख्याने, लेख, शोधनिबंध या माध्यमातून अनेक मौलिक विचार समाजातील विविध लोकांपर्यत पोहचविले आहेत. विशेष म्हणजे हे सगळे विचार समाजाच्या हिताचे आहेत.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सांगायचे झाल्यास, मागील 12 वर्षापासून अकोटच्या श्री. शिवाजी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील बि.कॉम भाग 1, 2 व 3 च्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य प्रा.प्रविण बोंद्रे करित आलेले आहेत.
प्रा.प्रवीण बोंद्रे यांचे कार्य समाजहिताचे आहे.यांच्या या कार्यामुळे समाजाची प्रगती होत आहे.
ही गोष्ट लक्षात घेऊन “महात्मा कबीर समता परिषद नांदेड या संस्थेने प्रा.प्रविण डिगांबर बोंद्रे यांना शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्य याकरिता तसेच वृत्तपत्र स्तंभ लेखक याकरिता 2023- 24 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण व जिवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे.
” यासंबधीचे पुरस्कार निवड मानपत्र प्रा.प्रवीण डिगांबर बोंद्रे यांना 23 ऑगस्ट 2024 ला प्राप्त झाले आहे. हा पुरस्कार सप्टेंबर महिन्यात 2024 ला नांदेड येथे “महात्मा कबीर समता परिषद नांदेड ” या संस्थेद्वारे देण्यात येणार आहे.