चान्नी पोलिस स्टेशनची कारवाई…
आरोपीला मुंबई येथून अटक…मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील आरोपीस विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल…
पातुर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम सायवणी येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष व फुस लावुन विशाल शुद्धोधन वानखेडे वय २३ वर्ष रा. देऊळगाव साकर्शा ता. मेहकर जिल्हा बुलढाणा या इसमाने पळून नेले असता अशा तक्रारी वरून पो.स्टे. चान्नी येथे अप. क्र.२५२ / २०२४ कलम ३६३ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
आरोपी मुलाने अल्पवयीन मुलीला घेऊन लपा – शापीचे प्रयत्न करीत होता. पोलिसांच्या नजरा चुकवीत होता. परंतू चान्नी पोलिस स्टेशन ला नव्याने रुजू झालेले प्रभारी ठाणेदार रवींद्र लांडे यांनी ईतर माहिती नुसार, तसेच तांत्रिक माहितीच्या द्वारे तसेच गुप्त माहिती नुसार तपास चक्र वेगाने फिरवून दि. २६ ऑगस्टला नाला सोपारा मुंबई येथून मानवी अनैतिक वाहतूक कक्ष अकोला येथिल पथक यांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले.
नमूद आरोपी विरुद्ध गुन्ह्यात पोक्सो अंतर्गत वाढीव कलम लावुन आरोपीस अटक केले. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अकोला तसेच बच्चन सिंग, उप विभागीय पोलिस अधिकारी बाळापूर श्री. गोकुळ राजजी यांच्या मार्गदर्शनाखाली चान्नी पो.स्टे. प्रभारी ठाणेदार रवींद्र लांडे तसेच पोलिस उप निरीक्षक संजय कोहळे, व पोलिस अमलदार सुधाकर करवते,पो.काॅ. अनिल सोळंके, पोलिस स्टेशन चान्नी तसेच मानवी अनैतिक वाहतूक कक्ष अकोला येथील पथक यांनी आरोपीला अटक केले.पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय कोहळे पो. काॅ.सुधाकर करवते हे करीत आहेत.