मूर्तिजापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे तर सर्वच पक्ष आपापल्या परीने निवडणुकीची मोर्चे बांधण्यासाठी सज्ज झाली आहे. तर भाजपाच्या वतीने निवडणुकीचा कार्यक्रमाचा सपाटा सुरू झाला आहे. काल-परवा मुर्तिजापूर शहरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या कार्यक्रमात पुन्हा मागील भाजप उमेदवार यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत वरिष्ठ भाजपदाधिकाऱ्याकडून देण्यात आले. त्यामुळे पुन्हा तोच उमेदवार मूर्तिजापूर विधानसभेतील जनतेवर लादणार काय? पुन्हा तोच उमेदवार या मतदारसंघाला मिळत असेल तर निकाल काय लागणार हे या मतदारसंघातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मात्र भाजपची अशी काय मजबुरी आहे की यांना दुसरे उमेदवार का दिसत नाही. गेल्या पंधरा वर्षात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात काय आणि किती विकास झाला हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मात्र यावेळी भाजप उमेदवार बदलणार असे दिसत असतानाही पुन्हा त्याच उमेदवाराची वर्णी लागत असल्याने हा मतदारसंघ भाजप कडून निसटणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
2019 च्या निवडणुकी अति उत्साही होऊन एका मोठ्या समुदायाच्या नेत्याचा रक्तगट काढून त्या रक्तामध्ये फॉल्ट आहे असं भरसभेत सांगून राज्यात मंत्री असलेल्या या नेत्याचा मोठा अपमान केला होता. त्यामुळे मतदारसंघात या उमेदवाराविषयीमोठा रोष निर्माण झाला होता. त्यावेळी मतदार संघात ठिकठिकाणी निषेध सुद्धा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना मतदारसंघात प्रचारासाठी फिरता सुद्धा येत नव्हते. अशावेळी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना हाताशी धरून या समुदायातील मते आपल्याकडे फिरवल्या गेली आणि कमी मताच्या फरकाने निवडून सुद्धा आले. मतदार संघात एवढी प्रचंड नाराजी असून सुद्धा निवडून आल्याचं त्यांचं कौतुकच करावे लागेल. यावेळी सुद्धा त्यांना तोच भ्रम असावा. ज्या समुदायाच्या नेत्याला एवढ्या खालच्या स्तरावर बोलून सुद्धा त्याच समुदायातील लोक त्यांच्यापुढे चरण वंदन करतात. एवढेच काय तर एका नेत्याला भर चौकात आई बहिणीवर शिवीगाळ करून समुदायाचा उद्धार सुद्धा केला होता तरी मात्र हा समुदाय त्यांच्या शिव्या खाऊन आशीर्वाद समजून सहन करून घेते. यावेळी भाजपपासून अनेक समुदाय दूर होतील असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे. गेल्या पंधरा वर्षात फक्त केवळ आपलाच उद्धार करून आणि ठेकेदारांचा उद्धार केला म्हणूनच ठेकेदारांचा मसीहा म्हणून नवीन ओळख तयार झाली आहे.
यावेळीही या उमेदवाराबद्दल प्रचंड रोष आहे आणि तिकीटही आपल्याच मिळते असा आत्मविश्वास या उमेदवाराला आहे. तर पक्षातील अनेक पदाधिकारी या उमेदवाराविषयी नाराज असल्याचे बोलले जाते. तर हा अजिबात कोणाला घाबरत नसून पक्षातील एका मोठ्या नेत्याला उद्धटपणे बोलला तरी सुद्धा तो नेता याच्यापुढे लाचार होतांना दिसला आहे. तर मतदारसंघातील महत्वपूर्ण भूमिका निभावणारे बूथ प्रमुखांची अवस्था तर फारच वाईट आहे. गेल्या पाच वर्षापासून हे बूथ प्रमुख दुर्लक्षित आहेत. अनेक बूथप्रमुखांची उमेदवार बदलून द्यावा अशी मागणी आहे. याच पक्षातील आणखी एका नेत्याने या उमेदवाराविषयी एल्गार पुकारला आहे. या उमेदवाराला उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांनी वरिष्ठाच्या भेटीला अनेक पदाधिकारी सुद्धा नेण्यात आले. मात्र एवढा विरोध असून सुद्धा जर यांना तिकीट मिळत असल्याने जिल्ह्यात या पक्षाचे मोठे नुकसान यावेळी होणार असल्याचे दिसत आहे.