रामटेक – राजु कापसे
लोकसभेनंतर विधानसभेचे बिगुल वाजताच अनेक पक्षप्रवेश आणि राजकीय पक्षांच्या सभा – संमेलने सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे. याचीच सुरूवात शिवसेनेकडून यशस्वी ठरली असून आदिवासी बहुल मतदार संघातील दाहोदा घोटी या ठिकाणी असंख्य युवकांनी आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेला आहे. आमदार ॲड. जयस्वाल यांच्या स्थानिक कार्यालयात युवा सेना उप जिल्हाप्रमुख कमलेश शरणागत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या पक्ष प्रवेशात गावातील सामाजिक कार्यकर्ते धर्मराज बागडे, रामेश्वर भागडकर, लोकेश इनवाते, आशिष डोकरमारे, मारुती सलाये, पंकज डोकरमारे, धीरज सोनवणे, प्रदीप चापले, रंजीत चापले, सुरेंद्र वागडे, दासराज रोहनकर, शुभम कुमरे, रुपेश इनवाते, देवराज इनवते, रामचंद्र भागडकर, बंडू भागडकर, दीपक परतेती,गौरव राऊत, शिवराज शिंदे, प्रकाश इडपाची, मधुकर काळे यांच्यासह अनेक युवकांनी प्रवेश घेतला.
यावेळी युवासेना तालुका संघटक आकाश पंधरे, समाजसेवक हरिदास सांगोडे, ग्रा.पं.पिपरीया चे माजी सरपंच शेखर खंडाते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पक्षप्रवेश केलेल्या सर्व युवकांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.