Friday, January 3, 2025
Homeराज्यसत्ताधाऱ्यांचे लक्ष इव्हेंटबाजीकडे, माता भगिनी सुरक्षा मात्र वाऱ्यावर...

सत्ताधाऱ्यांचे लक्ष इव्हेंटबाजीकडे, माता भगिनी सुरक्षा मात्र वाऱ्यावर…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – राज्यातील लाडक्या लेकींच्या सुरक्षेकडे इव्हेंटबाज महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने रामटेक मधील गांधी चौकात तोंडाला काळ्या फिती लावून आणि हातात काळे झेंडे घेऊन मूक आंदोलन करण्यात आले.

जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कानात या मूक आंदोलनाचा आवाज घुमल्याशिवाय राहणार नाही. सत्तेच्या धुंदीत असणाऱ्या या सरकारला महाराष्ट्रातील जनताच आता जागे करणार आहे. दि. 24 ऑगस्ट 2024 ला रामटेक येथील गांधी चौक येथे झालेल्या मुक निषेध मोर्चा प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे, रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखांद्रे,पारशिवनी तालुका प्रमुख कैलास खंडार, राष्ट्रवादी(शरद पवार) पार्टीचे रामटेक तालुका प्रमुख श्री. नकुल बरबटे,

युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर, कामगार सेना तालुका प्रमुख समीर मेश्राम, महिला रामटेक तालुका प्रमुख कलावती तिवारी, रामटेक शहर प्रमुख बादल कुंभलकर, उपशहर प्रमुख सचिन देशमुख, राहुल टोंगसे, मौदा तालुका संपर्क प्रमुख नरेश भोंदे, युवासेना तालुका प्रमुख निकुंज गराडे, शुभम डुकरीमारे व सर्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख व शिवसैनिक याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: