रामटेक – राजु कापसे
रामटेक : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यातील काही कुत्री आक्रमक असुन ती चावा घेण्याकरीता नागरीकांच्या मागे धावतात. त्यामुळे छोटी मुले, तरुण-तरुणी, महीलांसह नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मान झाले आहे.
शहरात सध्या कुत्रे आक्रमक झाले आहेत. कुत्रे माणसांना चावायला धावतात. गांधी वॉर्डातील गजानन गुंडुकवार यांनी सांगितले की, त्यांच्या घरासमोर त्यांच्यावर कुत्रा चावायला धावला. आपला जीव वाचवण्यासाठी पळाले. नरेश माकड़े म्हणाले त्यांचा मुलीचाहि मागे कुत्रे धावले होते. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी एक कुत्रा अदविक कोहळे यांना चावा घेण्यासाठी त्यांच्या मागे धावला. त्याच्या वडिलांनी त्याला चावण्यापासून रोखले. कुत्रे कारच्या मागे, दुचाकीच्या मागे धावतात. त्यामुळे अपघातही घडत आहेत.
अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात कुत्रे टोळक्याने दिसतात. प्रजनन हंगामामुळे कुत्रे अधिकच आक्रमक झाले आहेत. १० ते १२ कुत्रे एका गटात बसतात. शहरात असे ५० हून अधिक गट आहेत.
जे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मागे धावतात. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. कुत्रा चावल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. याशिवाय कुत्रेही रस्त्यावर घाण पसरवत आहेत. नगर परिषदेच्या उदासीनतेमुळे प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते सोडविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
अपघातांना कारणीभूत
ही कुत्री कारसह दुचाकी , तीनचाकी आणि सायकल वाहनांच्या मागे धावतात. त्यामुळे चालकांचे लक्ष विचलित होते आणि वाहनांवरील ताबा सुटल्याने अपघात होतात. काहीची दुचाकी वाहणे घाबरल्याने स्लीप होतात किंवा समोरील वाहनांवर धडकतात. सध्या कुत्र्यांचा प्रजननचा काळ असल्याने ती अधिकच आक्रमक झाली आहेत. प्रजननानंतर त्यांची संख्या आणखी वाढणार आहे.
कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार
गेल्या तीन ते चार वर्षांत कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नगरपरिषदही काहीच करत नाही. अशा स्थितीत कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार?
मुख्याधिकारी काय म्हणतात : मुख्याधिकारी पल्लवी राऊत म्हणाल्या की, कुत्रा विषयी पाठलाग केल्याची तक्रार आली आहे. लवकरच श्वान मालकांना सूचना देऊन कुत्रा घरी बांधून ठेवण्याचा इशारा देण्यात येणार आहे. माणसांना चावायला धावणाऱ्या कुत्र्यांवर कारवाई केली जाईल.