रामटेक – राजु कापसे
रामटेक : अंधश्रद्धा चे निर्मूलन करण्या करिता सरकारी आदेश नुसार प्रत्येक ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्या बाबद रामटेक अंधश्रद्धा निर्मूलन समितिने रामटेक पुलिस स्टेशन चे ठानेदार प्रशांत काळे याना निवेदन दिले आहे.
नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूला अकरा वर्ष पूर्ण झाले. त्याचे स्मरण म्हणून राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेंरिंग दोरजे यांच्या आदेशाने, नरबळी आणि इतर अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत, अधिनियम 2013 च्या कलम 5 (1 )अन्वये पोलीस आयुक्ताच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त गुन्हे तसेच, पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांची, दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याच्या अंमलबजावणीसाठी , प्रतेक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तालुका कार्यकारिणीने या पत्राच्या अनुषंगाने रामटेक पोलीस स्टेशन मध्ये कक्ष स्थापन करावा व त्याची माहिती जनतेसमोर जाहीर करावी .जेणेकरून पिडीत लोक आपली तक्रार निर्भयपणे या स्वतंत्र कक्षाकडे घेऊन येतील.
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समिती रामटेक कार्याध्यक्ष कांचनमाला मोरेश्वर माकडे, सचिव नानाभाऊ उराडे , मनोज नौकरकर , एडवोकेट प्रफुल अंबादे, एडवोकेट आनंद गजभिये, नीलकंठ महाजन ,भागवत सहारे , सुरेखा उराडे, ममता राळे, अनिता जनबंधू, एम के मेश्राम, उलझा ढवळे, सीमा मेश्राम, समिता धनगरे, लक्ष्मी बोरकर, प्रमोद मेश्राम, राहुल जोहरे, प्रकाश मेश्राम,भास्कर गयगये, सुनील गयगये, रीना जांभुळकर सहित आदि कार्यकर्ते निवेदन देताना हजर होते.