Sunday, December 22, 2024
Homeराज्यशेतकरी शेतमजुरांच्या मुलांसाठी सर्वोत्तम सुविधा निर्माण करणार - प्राचार्य डॉ. निकस...

शेतकरी शेतमजुरांच्या मुलांसाठी सर्वोत्तम सुविधा निर्माण करणार – प्राचार्य डॉ. निकस…

मराठा सेवा संघाच्या वतीने केला सत्कार

मालेगाव ( वाशिम ) – चंद्रकांत गायकवाड

मालेगांव – आमच्या कॉलेज मधे ग्रामीण व तांड्या – वस्त्या तसेच दुर्गम भागातील गोरगरीब शेतकरी शेतमजुर वंचित विद्यार्थी महावियालयीन शिक्षणासाठी मोठ्या संखेने येतात . त्यांना उत्तम शिस्त व सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण मिळून ते त्यांच्या जिवनात यशस्वी व्हावे.

त्यासाठी पुस्तकी ज्ञानासोबतच स्पर्धा परीक्षेचीही त्यांची तयारी व्हावी , त्यांना या बदलत्या जगाचे ज्ञान मिळावे यासाठी येणाऱ्या काळामधे सर्वोत्तम सुविधा देण्याचे काम मी प्राधान्याने करणार असल्याचे मत येथील रामराव झनक महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य योगेश्वर निकस यांनी त्यांच्या सत्काकार प्रसंगी व्यक्त केले . या महाविद्यालयाला प्रथमच उच्चविद्याविभुषित व डॉक्टरेट झालेले प्राचार्य मिळाल्या बद्दल त्यांचा मराठा सेवा संघातच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मराठा सेवा संघ या परिवारातनवादी चळवळीमध्ये काम करणारे प्राचार्य निकस हे सन २००३ मधे रामराव झनक महाविद्यालयामधे शारीरिक शिक्षण संचालक म्हणुन रुजु झाले . शिव शाहु फुले आंबेडकरी विचारांचा वसा घेतलेले प्राचार्य निकस यांना सतत सकारात्मक काम करण्याची आवड आहे . त्यांनी अमरावती येथील जगविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रिडा महाविद्यालयातुन प्रथम बी पी ई ही पदवी व नंतर एम पी एड ही उच्च पदुत्तर पदवी प्राप्त केली.

तसेच त्यांनी अडीशनल बी ए करून बी एड ही पदवी मिळवली , नंतर सेट व नेट या परीक्षा उत्तीर्ण केल्या . त्यानंतर त्यांनी “बालसुधार गृहातील मुलांच्या मानसिक घटकांवर योग अभ्यासाच्या परिणामाचे अध्ययन ” या विषयात पी एच डी केली . नुकतीच त्यांची त्यांच्याच रामराव झनक कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य पदी नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांचा मराठा सेवा संघाचे वतिने सत्कार करण्यात आला . यावेळी से.नि. प्राचार्य वसंतराव अवचार , प्रा भरत आव्हाळे , प्रा . अनंतराव गायकवाड , अॅड शंकरराव मगर , तेजराव पाटील जाधव , चंद्रकांत बोरकर , विजयराव देवळे , प्रा वसंत आरू , प्रा डॉ लता जावळे , प्रा डॉ भिमराव जांभरूनकर, प्रा डॉ वाघ , प्रा डॉ ताजने , प्रा जमधाडे आदी मान्यवर उपस्थित होते .

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: