Saturday, December 21, 2024
Homeराज्यभरधाव कारच्या धडकेत काकु, पुतन्या ठार, टी. पॉईंट - मौदा मार्गावरील हॉटेल...

भरधाव कारच्या धडकेत काकु, पुतन्या ठार, टी. पॉईंट – मौदा मार्गावरील हॉटेल रेनबो समोरील घटना…

दोन्ही मृतक हमलापुरी गावतील रहिवाशी

हमलापुरी गावात शोककळा

रामटेक – राजू कापसे

भरधावं कारच्या धडकेत मोटरसायकलवर स्वार असलेल्या काकु, पुतन्याचा करून अंत झाल्याची घटना आज दि. २१ ऑगस्ट ला दुपारी साडेबाराच्या सुमारास शितलवाडी टी पॉईंट ते मौदा मार्गावरील हॉटेल रेनबो समोर घडली. अपघात एवढा भिषण होता की मृतकाची मोटारसायकल घटनास्थळावरून विस ते तिस फुट फेकल्या गेली. वार्ताने हमलापुरी गांवात पसरली शोकाकळा पसरली आहे.

सविस्तर माहिती नुसार मृतक सचिन विजय ठकरेले वय ३० वर्ष व सौं. विजया भीमराव ठाकरेले वय 52 वर्ष रा. हमलापुरी ता. रामटेक असे मृतकांची नावे असुन हे दोघेही मोटर सायकल क्र एम.एच. ३६ ए.एम. ११७५ या गाडीने रामटेकला आपल्या बाळाला पाहून आपल्या घरी परत जातं होते.

त्या दरम्यान विरद्ध दिशेने येणाऱ्या भरदाव स्विफ्ट गाडी क्र. सी.जी. ०४ एन.एच. ६५१५ या गाडीने धडक दिल्याने सचिन व सौं विजया यांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीष्ण होता की मृतकाची गाडी २० ते ३० फूट फेकल्या गेली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांनापण ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.

रुग्णालयात हमलापुरी व आजू बाजूच्या गावातील नागरिकांची गर्दी जमली होती. एकाच कुटूंबातील पुतण्या व काकू गेल्याने गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आरोपी गाडी चालक शंकर किशोर जेसवानी वय २३ वर्ष रा. रायपूर व सोबत पंकज मोतीराम नागवानी वय ३९ वर्ष रा.रायपूर व एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून वाहन चालकाविरोधात गुन्हा नोद केला आहे. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.

मृतक सचिन याच्या पत्नीची नुकतीच १९ तारखेला रामटेक येथील एका खाजगी रुग्णालयात प्रसुती झाली. त्यात एक सुंदर बाळ जन्मालाआला. मात्र अवघ्या दोन दिवसातच म्हणजे आज २१ ऑगस्ट ला चिमुकल्यावरून बापाचे छत्र हरवले. ही वार्ता भल्याभल्यांच्या काळजाला हादरवुन सोडणारी असावी. मृत सचिन हा मौदा येथील एन.टी.पी.सी. मध्ये कार्यरत होता तर काकू सौं. विजया ही घरकाम करायची. बाळाचा जन्म झाल्यावर त्याला पाहून जातं असतांनाच अपघातात त्या मुलाचे वडील व सोबत त्याची  काकू  ठार झाली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: