Thursday, January 2, 2025
Homeराज्यरामधाम येथे सामूहीक रक्षाबंधन महोत्सव...

रामधाम येथे सामूहीक रक्षाबंधन महोत्सव…

रामटेक – राजू कापसे

भाऊ बहिणीचा पवित्र सन रक्षाबंधनाचा शुभपर्वावर रामधाम तीर्थ मनसर येथे प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय रामटेक, पारशिवनी, नगरधन तर्फे सामूहिक रक्षाबंधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय रामटेक ललिता दीदी यांनी उपस्थित महिलांना रक्षाबंधनाचे महत्व समजावून सांगितले. रामधामचे संस्थापक श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमांचा माध्यमातून समाजसेवेचे कार्य करीत असतात. दरवर्षी गरीब मुलीचे सर्वधर्मीय निशुल्क विवाह लावून देतात, गरिबांचा मुलींना शिक्षणासाठी मदत करतात.

नुकतेच रामधाम येथे मागील काही दिवसापासून दर शनिवारला महिलांना विविध मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वरोजगार करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. करिता प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय रामटेक, पारशिवनी, नगरधन तर्फे रामधाम येथे सामूहिक रक्षाबंधन महोत्सव आयोजित केले. प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयचा दीदीनी व महिला बचत गटातील महिलांनी श्री. चंद्रपाल चौकसे यांना राखी बांधली व मिठाई देत रक्षाबंधनाचा शुभेच्छा दिल्या.

यावेळी ललिता दीदी (प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय रामटेक), छाया दीदी (प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय पारशिवनी), श्रीनिवास भाई, सुरेखा दीदी, वैशाली दीदी, श्री. देविदासजी जामदार (माजी सभापती कृ.उ.बा.स. पारशिवनी), श्री. संदीप मडावी (अध्यक्ष बिरसा ब्रिगेड) व समस्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: