अमरावती – दुर्वास रोकडे
रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भाऊ यांच्या प्रेमाच्या अतूट नात्याला आणखी घट्ट आणि मजबुत करणार सण.रक्षाबंधनाला बहीन आपल्या भावाला राखी बांधून भावाकडून आपल्या रक्षेचा विश्वास मागते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहीण एकत्र येत असतात परंतु अशी अनेक भाऊ आहे ज्यांचे हात राखी विना राहत असतात अशीच परिस्थिती अनेक वृद्धाश्रमामधील आहे आयुष्याच्या संध्याकाळी आपला आयुष्य वृद्धाश्रमात घालवणाऱ्या वृद्ध देखील आपल्या हाताला कोणीतरी येऊन आपली बहीण राखी बांधील ही अपेक्षा असते या वृद्धांच्या हाताला राखी बांधली गेली पाहिजे आणि त्यांचेही रक्षाबंधन सादर झालं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिवसातील सामाजिक कार्यकर्ता वैष्णवी काजळकर यांनी मोझरी येथील वृद्धाश्रमात जाऊन निराधार वृद्ध वृद्धा सोबत रक्षाबंधन साजरा केला…
यावेळेस वैष्णवी काजळकर यांनी या वृद्धांना राखी बांधून बहिणीचं, नातीचं आणि मुलीचं कर्तव्य निभावला आहे. यावेळी वृद्धांचे डोळे आनंदाश्रुने पाणावले होते. वैष्णवी काजळकर यांनी वृद्धाश्रमात केलेल्या रक्षाबंधनाच सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.आपल्या भावाबरोबरच अशा निराधार लोकांनाही राखी बांधून आपण रक्षाबंधन साजरा केला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली..