पातुर – निशांत गवई
पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथे १७ वर्षापासून कार्यरत असलेले रोजगार सेवक शेख उस्मान यांना पदावरून काढण्याचा षड्यंत्र होत असल्याने गावकऱ्यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. रोजगार सेवक १७ वर्षापासून कार्यरत असून,ते मनमिळावू कर्तव्यदक्ष आहे.
त्यांच्यापासून गावकऱ्यांना कोणताही प्रकारचा त्रास नाही, उलट ते शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्व गावकऱ्यांना नेहमी प्रमाणे समजावून सांगून अमलात आणतात, जसे वृक्ष लागवड, चंदन लागवड, तृती लागवड, गाय म्हशी शेड,घरकुल अशा विविध शासनाच्या योजना राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
परंतु सरपंच जहूर खान हे त्यांना आपल्या पदाचा धाक दाखवून त्यांच्या कामात व्यत्यय आणतात, असा आरोप गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. सरपंच जहुर खान, रोजगार सेवक शेख उस्मान यांना कामावरून कमी करण्याचा हेतूपरस्पर प्रयत्न करीत आहे. मात्र गावकऱ्यांना त्याच्यापासून कोणताही त्रास नसल्यामुळे त्यांना रोजगार सेवक या पदावरून कमी करू नये अशा प्रकारे निवेदन दिले आहे.
रोजगार सेवकाला पदावरून कमी केल्यास उपोषण
१७ वर्षापासून रोजगार सेवकाची गावकऱ्याकडून कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, त्यामुळे रोजगार सेवकाला पदावरून कमी केल्यास पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसण्यात येईल शेख साजिद ग्राम पंचायत सदस्य खेट्री…
मी गेल्या १७ वर्षापासून रोजगार सेवक या पदावर कार्यरत आहे. गावातील माझ्या विरोधात कुठल्याही प्रकारची तक्रार नाही मात्र सरपंच पदाचा धाक दाखवून मला पदावरून कमी करण्याच्या धमक्या देत आहे. पैशासाठी माझ्यावर दबाव तंत्राचा वापर करणे सुरू आहे. शेख उस्मान रोजगार सेवक खेट्री.