Saturday, December 21, 2024
Homeमनोरंजनआता 'सत्यशोधक' चित्रपट राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्याचा शासनाचा निर्णय...

आता ‘सत्यशोधक’ चित्रपट राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्याचा शासनाचा निर्णय…

मुंबई – गणेश तळेकर

सत्यशोधक हा चित्रपट राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्याचा शासनाचा निर्णय समता फिल्म प्रोडक्शन निर्मित सत्यशोधक हा चित्रपट मागील चार महिने आधी महाराष्ट्रभर प्रदर्शित करण्यात आला.

हा चित्रपट करमुक्त तथा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला. हा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांनी पाहणे अत्यंत गरजेचे आहे अशी विनंती प्रशासनाला प्रोडक्शन ने केली त्यावर प्रशासनाने हिरवी झेंडी दिल्याने आता राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखविण्यात येत आहे त्यासाठी सत्यशोधक टीम व त्यांचे सहकारी प्राचार्य/ मुख्याध्यापक यांच्याशी समन्वय साधत आहेत.

विदर्भातील सर्व शाळांमध्ये हा सिनेमा दाखवण्याची जबाबदारी सत्यशोधक टीमचे सदस्य व या चित्रपटाचे सहाय्यक अभिनेता मुकुंद कुमार नितोणे यांनी स्वीकारली असून ते विदर्भातील सर्व शाळांमध्ये जाऊन हा चित्रपट दाखवतील. हा चित्रपट पाहण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये त्याकरिता प्राचार्य/ मुख्याध्यापक /केंद्रप्रमुख तथा शिक्षक बंधू बघिणीनी पुढाकार घ्यावा व सत्यशोधक टीमला सहकार्य करावे असे आवाहन चित्रपटाच्या निर्मात्यांनी केले आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: