Saturday, December 21, 2024
Homeमनोरंजनबाल रंगभूमी परिषद दरवर्षी हा 'जल्लोष लोककलेचा' उत्सव आयोजित करणार - एड...

बाल रंगभूमी परिषद दरवर्षी हा ‘जल्लोष लोककलेचा’ उत्सव आयोजित करणार – एड नीलम शिर्के सामंत…

मुंबई – गणेश तळेकर

अशा महोत्सवातून मुलांमधे लोककला संस्कृतीची आवड निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम करतेय .असा विश्वास व्यक्त करत , या जल्लोष लोककलेचा मिळणारा मोठा प्रतिसाद पहाता बालरंगभूमी परिषद दरवर्षी हा महोत्सव महाराष्ट्रभर आयोजित करणार अशी घोषणा एड नीलमताई शिर्के सामंत, बालरंग भूमी अध्यक्षा. यांनी त्त्यांच्या भाषणात बोलून दाखविला.

बालरंग भूमी परिषद, बृहन्मुंबई शाखा आयोजित ” जल्लोष लोककलेचा २०२४” या भायखळा येथे अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजित पुरस्कार सोहळ्यात कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या . त्यांनी आपल्या भाषणात महोत्सवाा सहभागी मुला मुलीशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले.या महोत्सवात मुंबईभरातून लोककला सादरीकरणा साठी मोठ्या संख्येने शाळा आणि संस्थानी सहभाग नोंदविला होता.

जल्लोष लोककलेचा या महोत्सवातील सन्मान पुरस्कार प्राप्त संघ :

●सर्वोत्कृष्ट :SVS हायस्कूल, वरळी
लोकनृत्य प्रकार : कोरकू नृत्य.
उत्कृष्ट– विद्यानिधी हायस्कूल, जुहू
लोकनृत्य प्रकार : डांग्र्या
●उत्तम* -मराठा हायस्कूल, वरळी लोकनृत्य प्रकार : वारली. यांना पुरस्कार देण्यात आले.
तसेच प्रशंसनीय* पुरस्कार
●रायजिंग स्टार डान्स स्टुडिओ
लोकनृत्य प्रकार : पोतराज,
●इमेज मेकर ट्युलिप इंग्लिश स्कूल
लोकनृत्य प्रकार : माऊली
●महात्मा गांधी विद्यामंदिर बांद्रा. शेतकरी नृत्य -झुंजुमुंजु पहाट झाली
●एस व्ही एस इंग्लिश स्कूल वरळी कोरकू लोककला
●एस.व्हि.आय. प्रायमरी इंग्लिश स्कूल कोळी नृत्य
●सनराइज् इंग्लिश स्कूल विक्रोळी -गौर नाच एग गौरबाई
●विद्यानिधी हायस्कूल जुहू डांगऱ्या नंदा गवळ्याच्या
● मराठा हायस्कूल वरळी वारली लोकनृत्य – रामाचे वनवासी
●बालमोहन विद्यामंदिर आदिवासी- ठेमसा नृत्य
●पाटकर गुरुजी आदिवासी -पावरा नृत्य.. यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देणार आले.
रंगभूषा वेशभूषा पूर्ण तयारीनिशी सहभागी झालेल्या बालकांच्या या महोत्सवाला महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशा असा जल्लोष लोककलेचा महोत्सव हाऊसफ़ुल्ल गर्दीत साजरा झाला.
पालक शिक्षक सहकारी मार्गदर्शक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित राहिले होते. या महोत्सवासाठी परिक्षक म्हणून काम पाहिले डॉ. किशुपाल ,डॉ. शिवाजी वाघमारे , स्मिता वेताळे यांनी.

संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेत बृहन्मुंबई शाखेचे कार्यवाह असिफ अन्सारी, कार्याध्यक्ष ज्योती निसळ, अध्यक्ष राजीव तुलालवार, उपाध्यक्ष सुनील सागवेकर, कोषाध्यक्ष यशोदा माळकर तसेच इतर कार्यकर्ते लव क्षीरसागर, हनुमान पडमुख, महेश कापडोसकर, यांनी मोलाचा हातभार लावला…

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: