आयपीएस गोकुळराज यांची कारवाई
पातूर – निशांत गवई
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आलेगाव येथील एका गुटखा तस्कराच्या दुकान व गोडाऊन वर छापा मारून शनिवारी तब्बल दहा लाखाचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे आयपीएस गोकुळ राज यांच्या माहितीवरून संयुक्तरीत्या ही कारवाई करण्यात आली आहे.
१७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांच्या गोपणीय माहितीवरून, ठाणेदार रविंद्र लांडे, पोलीस स्टेशन चान्नी यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन केदार, व पोलीस स्टेशन चान्नी येथील पोलीस कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कार्यालय येथील पोलीस कर्मचारी व पोलीस स्टेशन पातुर येथील पोलीस कर्मचारी यांनी ग्राम आलेगांव येथे अवैद्य गुटखा विक्री करणार संदिप विलासराव देवकते(३५) रा. आलेगांव यांचे दुकाण व गोडाउन मध्ये गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विकी करीता साठवुण ठेवले असल्याचे गोपनीय माहीतीवरून छापा टाकून दुकाण व गोडावुन मधुन तंबाखुजन्य पदार्थ ५ लक्ष ३ हजार ७८६ रुपये एक चारचाकी वाहण किमंत ५ लाख रुपये, एक मोबाईल १० हजार रुपये असा एकुन १० लक्ष १३ हजार ७८६ चा मुददेमाल जप्त केला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज , यांचे गोपणीय माहितीवरून, ठाणेदार रविंद्र लांडे, पोलीस स्टेशन चान्नी यांचें नेतृत्वात पोउपनी गजानन केदार पोकों सुनिल भाकरे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गिते, उज्वला ईटीवाले, राहुल वाघ, चालक एएसआय संजय मात्रे ,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बाळापुर येथील पोहवा संतोष सोळंके, पोहवा संतोष करंगळे, पोशि विठठल उकर्डे, पोशि गजानन शिंदे, पोशि योगेश चौधरी, पोशि स्वपनील वानखडे तसेच पोस्टे पातुर येथील पोशि ईस्माईल, पोशि शंकर बोरकर, पोशि अंकुश राठोड, यांनी केली.