प्रतिनिधी । मूर्तिजापूर
राज्यात आगामी विधानसभा निवडणूक पाहता मूर्तिजापूर मतदारसंघात अनेक पक्षांनी या मतदारसंघावर दावे केले आहे. मात्र मुळातच राष्ट्रवादीचा मतदारसंघ असलेला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात यावेळेस सुद्धा राष्ट्रवादी लाच सुटणार असल्याचे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते सांगतात. अनेक उमेदवारांनी आपली पसंती राष्ट्रवादीपक्षा कडे दाखवली आहे व उमेदवारी सुद्धा मागितली आहे. तर काही शेजारी जिल्ह्यातूनही पार्सल उमेदवार मतदारसंघात सक्रीय झाले असल्याने येथील स्थानिक उमेदवारांची फार मोठी गोची झाली आहे.
हा मतदार संघ कॉंग्रेसला मिळावा म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मागणी वाढली मात्र हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळणार असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. तर या मतदार संघाचेप्रमुख दावेदार रवी राठी असून मागील निवडणुकीत त्यांनी 42 हजारपेक्षा जास्त मते घेतली होती. त्यामुळे हे सध्या राष्ट्रवादीचे प्रमुख दावेदार मानले जातात. दुसरे दावेदार हे जिल्हा परिषदेचे सदस्य सम्राट भाऊ डोंगरदिवे सोबतच आनंद उर्फ पिंटू वानखडे व प्रा. कांबळे सर यांचेही नवे अग्रेसर आहेत. बाकी नावे अजिबात कोणत्याच पारड्यात बसत नसल्याने लोक त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा करीत नाही. यापैकी रवी राठी हे गेल्या 10 वर्ष पासून मतदार संघात सक्रीय असून त्यांची शेवटच्या मतदारांपर्यंत ओळख आहे. त्यांचा मतदार संघात दांडगा जनसंपर्क असल्यामुळे यावेळेस ते बाजी मारू शकतात असे काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ते राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव असल्यामुळे त्यांनी मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांना एकजूट केले असून त्यांना जर तिकीट मिळाली तर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरतील. त्यामुळे रवी राठी हे आतापासूनच पासूनच प्रचारात अग्रेसर झाले असल्याने उमेदवारी मिळण्यार असल्याच्या गावोगावी चर्चा रंगल्या आहेत.
लोकसभेच्या प्रचाराकरिता त्यांनी मूर्तिजापूर मतदार संघ पिंजून काढला होता व त्याचा फायदाही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ उमेदवार अभय पाटील यांना झाला असल्याचे समजते. मात्र अभय पाटील यांना यश संपादन करता आले नसले तरी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी दिवस रात्र एक केल्याचे बोलल्या जाते. त्यावेळेस विधानसभेच्या निवडणूकी उमेदवारी मागणाऱ्यांपैकी फक्त रवी राठी एकमेव व्यक्ती होते. मात्र आता तर उमेदवारीसाठी खंडीभर उमेदवार दिसत आहेत. त्यांनी लोकसभेत केलेल्या कामाची नोंद पक्षाने घेतली असून त्यानांच उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जाते. मात्र वेळेवर पक्षश्रेष्ठीं काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.