मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हा जसा राखीव झाला आणि जे कधीच न बघितलेले नवनवीन चेहरे या मतदारसंघात बघायला मिळाले. कधीतरी अनुसूचित जातीचा राग करणारी मंडळीही आता अशा विशिष्ट उमेदवाराचे गोडवे गाऊ लागली. मात्र मतदारसंघातील भूमिपुत्र असलेल्या चांभार आणि मातंग व नवबौद्ध या अनुसूचित जातीच्या उमेदवाराला भाजप विसरली. भाजप फक्त हिंदू म्हणून यातील दोन समाजाचे मत घेतात. मात्र त्यांना उमेदवारी पासून दूर ठेवतात. आता या मतदारसंघात येथील भूमिपुत्र असलेल्या अनुसूचित जातीचा उमेदवार हवा आहे. अन्यथा यावेळी भाजपचे काही खरं नाही असा सूर या दोन्ही समाजातील आहे.
अनुसूचित जातीची संख्या जास्त असल्यामुळे हा मतदारसंघ राखीव करण्यात आला. मात्र राखीव झाला आणि या मतदार संघाचा सत्यनाश झाला. प्रगती कडे जाणारा मतदारसंघाचा विकासच खुंटला गेला. या मतदार संघातील मूर्तिजापूर तालुक्यातील शेतीसाठी सिंचनाची मोठी सोय केली होती. यासाठी तालुक्यातील तीन ठिकाणी बंधारे प्रकल्प उभे केल मात्र ते15 वर्षातही त्याचे काम पूर्ण झाले नाहीत. शिक्षणाचं तर सोडाच. त्यामुळे भाजपच्या लोकप्रियतेचा ग्राफ हा कमी होत चालला आहे. मागील निवडणुकीत केवळ २ हजाराच्या मताने निवडून आलेले भाजपचे उमेदवार यावेळी मात्र 20 हजार मतांनी पिछाडीवर राहतील असा अंदाज येथील राजकीय तज्ञाचा आहे. म्हणूच या मतदार संघात आता बदल हवाय असा सुर येथील मतदारांचा आहे.
भाजपने या मतदारसंघात आजपर्यंत ही भूमिपुत्र असलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. अनुसूचित जातीत येणारे चांभार आणि मातंग व सर्वात जास्त संख्येने असलेले बौद्ध समाज मात्र या तिन्ही समाजातील एकाही उमेदवाराला भाजपने आज पर्यंत उमेदवारी दिली नाही. का दिली जात नाही याचं कारणही कोणाला माहित नाही. अनुसूचित जातीतील चांभार आणी मातंग या दोन्ही जातीची संख्या जवळपास 30 हजाराच्या जवळपास आहे. तरीही या जातीतील उमेदवारांना उमेदवारी नाही. दोनशे तीनशे मतदार असलेल्या अशाच उमेदवाराला गेल्या पंधरा वर्षापासून उमेदवारी मिळत असल्याने बाकी बहुसंख असलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारावर हा अन्याय नाही का?.
भाजपला बौद्ध समाज मतदान करत नाही असे छातीठोकपणे सांगणारे भाजपचे काही कार्यकर्ते हे विसरले कि अकोला महापालिकेत 11 पैकी 7 बौद्ध नगरसेवक भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. बर भाजपला बौद्ध उमेदवारांची अलर्जी आहे मग मातंग आणि चांभार यांना का उमेदवारी देत नाही?. असाही प्रश्न या दोन्ही समाजाला पडला आहे. या समाजात अनेक योग्य उमेदवार आहेत मात्र त्यांना संधी भाजप देत नसल्याने आता हे दोन्ही समाज दुसर्या पक्षाकडे जाण्याच्या तयारीत आहेत. जर असे झाले तर येणाऱ्या विधानसभेत भाजपला निवडून येणे शक्य होणार नाही. त्यामुळे या तिन्ही समाजीतील सक्षम उमेदवाराला भाजपची उमेदवारी मिळाली तरच भाजप जिंकू शकते अन्यथा….
विशेषतः बौद्ध समाजाचा मतदार आता सुज्ञ झाला असून तो भावनेच्या आहारी जाण्याच्या मानसिकतेत नसल्याचे वास्तव स्विकारून आतापर्यंत केवळ गैरसमजातून दूर ठेवलेला हा समाज आपल्यासोबत जोडून घेण्याची संधी यावेळी भाजपला मिळत आहे, त्या संधीचे सोने या पक्षाने करून घ्यावे, ज्यामुळे भाजपने या मतदरसंघातील लोकांच्या मानगुटीवर बसविलेले बीन कामाचे भूत खाली उतरेल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत…